अबोल प्रेम...
आठवत होता शब्द
काळजात रुतलेला,
काही बंधनात होतो
उचलू कसा पाऊला....
रडू कसा अंधारात
होता हुंदका दाटलेला,
भोवती अथांग सागर
कोरडा किनारा पडलेला....
हात हातात घेवून
तो क्षण ही विसावला,
तुझ्या अबोल प्रेमात
कसा विसरू तुला.....
मित्र म्हणतात काही
आज तू खूप बदलला,
कसा सांगणार त्यांना
मी शब्दात गुंतलेला...
संजय सावळे