विश्वास....
याददास्त थोडी
कमजोर आज झाली...
माझीच आज सारी
नाती रिक्त झाली....
गत नात्याची उणीव
आज फार झाली.....
मी बघितले सहज भोवती
स्मशाने उभी पेटलेली...
रडू कसा आज मी
खंत मनी खूप दाटलेली. ....
विश्वास पेरीत गेलो
जमीन पडीक निघाली......
संजय सावळे