स्वप्नाली....
बेधुंद गरब्यात
क्षणभर तू दिसली,
बावरलो ना सावरलो
ही प्रीत कशी फसली....
पारमंब्याचा वृक्ष मनी
उंच झुल्यात तू बसली,
थुईथुई नाचतो मोर मनी
लांडोर मनात हसली...
कोसळतांना जलधारा
चिंबओली तू झाली,
भरून आले आभाळ सारे
अंगात वीज भरली....
पायघड्या त्या स्वप्नाच्या
मनी मज उतरली,
विसरू कसा सखे तूज
रात्र खूप झाली...
अशाच रात्रा कैक गेल्या
ना मज तू दिसली ,
स्वप्नाळू मनात मी
हळूच कशी प्रभात झाली....
संजय सावळे