स्पर्श...
सांजवेळी मी खिडकीत बसलेलो
पाऊस सारखा चालू होता..
गार वातावरणात वारा
उघड्या अंगावरती झोंबत होता...
क्षणभर वर बघितलं ढगाकडं
काळोख गच्च दाटला होता....
असल्या किती रात्री आल्या गेल्या
गंध तुझा जात नव्हता...
खूप शोधले हरवल काय,
मखमली स्पर्श तुझा
ओंजळीत भरला होता...
संजय सावळे..