महाभारत सत्य की मिथ्य? (Marathi)
रुद्रमुद्रा रमेश अणेराव
महाभारताचा हिंदू धर्माशी सखोल संबंध आहे आणि आधुनिक हिंदूंवर आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरेवर त्याचा प्रचंड प्रभाव आहे. भारतातील बरेच लोक महाभारताला वास्तविक घटित घटनांची एक मालिका समजतात. काही भारतीय या अगम्य महाकाव्यातून घडलेल्या घटनांची इतिहासात नोंद केली आहे. हे महाकाव्य एक ऐतिहासिक लेख समजले जाते. महाभारत हे सत्य आहे की दंतकथा हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे. आपण याची पाळेमुळे खोदुन काढण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला की जाणवते की महाभारत प्राचीन भारतीय इतिहासाला लाभलेली समृद्ध आणि वास्तवदर्शी माहिती आहे. महाभारताच्या सत्यता आणि दंतकथा असण्यावर लिहिलेले लेख वाचल्यास प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे अश्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येतील. त्या घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याला बहुधा मतांची एक बाजू मिळेल अशीही समजेल ज्यालेखी महाभारतातील वास्तव ही वस्तुस्थिती नाही. या चर्चेअंती इतके तर सत्य आपल्याला कळेल की महाभारत हा भारताचा एक समृद्ध आणि ज्ञानाने ओतप्रोत भरलेला भारतीय इतिहास आहे यात शंका नाही.READ ON NEW WEBSITE