Get it on Google Play
Download on the App Store

तपश्चर्या व तत्वबोध 5

उपोषणें

याप्रमाणे हठयोगाचा अभ्यास करून त्याच्यांत तथ्य नाही असें दिसून आल्यावर बोधिसत्त्वाने उपोषणाला सुरुवात केली.  अन्नपाणी साफ सोडून देणें त्याला योग्य वाटलें नाही.  पण तो अत्यंत अल्पाहार सेवन करूं लागला.  भगवान् सच्चकाला म्हणतो, ''हे अग्गिवेस्सन, मी थोडा थोडा आहार खाऊं लागलों.  मुगांचा काढा, कुळथांचा काढा, वाटाण्याचा काढा किंवा हरभर्‍यांचा (हरेणु) काढा पिऊनच मी राहत होतों.  तो देखील अत्यंत अल्प असल्यामुळे माझें शरीर फारच कृश झालें.  आसीतकवल्लीच्या किंवा कालवल्लीच्या गाठींप्रमाणे माझ्या अवयवांचे सांधे दिसूं लागले.  उंटाच्या पावलाप्रमाणे माझा कटिबंध झाला.  सुताच्या चात्यांच्या माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसूं लागला.  मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात, तशा माझ्या बरगड्या झाल्या.  खोल विहिरींत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझीं बुबुळें खोल गेलीं.  कच्चा भोपळा कापून उन्हांत टाकला असतां जसा कोमेजून जातो, तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली.  मी पोटावरून हात फिरविला तर पाठीचा कणा माझ्या हातीं लागे आणि पाठीच्या कण्यावरून हात फिरविला म्हणजे पोटाची चामडी हातीं लागत असे.  याप्रमाणें पाठीचा कणा आणि पोटाची चामडी एक झाली होती.  शौचाला किंवा लघवीला बसलों, तर मी तेथेच पडून राहीं.  अंगावरून हात फिरविला असतां माझे दुर्बळ झालेले लोम आपोआप खाली पडत.''

वितर्कांवर ताबा

बोधिसत्त्वाने सात वर्षे तपश्चर्या केली असा उल्लेख अनेक ठिकाणीं सापडतो.  या सात वर्षांत बोधिसत्त्व प्राधान्येंकरून देहदंडन करीत असला, तरी त्याच्या मनांत दुसरे विचार घोळत नव्हते, असें नाही.  वर दिलेल्या तीन उपमा पाहिल्या तरी असें दिसून येतें की, कामविकार पुरे नष्ट केल्यावाचून नानाविध कायक्लेशांचा उपयोग होणार नाही, हें त्याला स्पष्ट दिसत होतें.  याशिवाय आणखीही सद्विचार त्याच्या मनांत येत, असें अनेक सुत्तांवरून दिसतें. त्यांपैकी कांही विचारांचा येथे थोडक्यांत संग्रह करीत आहें.

मज्झिमनिकायांतील द्वेधावितक्क सुत्तांत भगवान् म्हणतो, ''भिक्षु हो, मला संबोध प्राप्‍त होण्यापूर्वी, मी बोधिसत्त्व असतांनाच माझ्या मनांत असा विचार आला की, वितर्कांचे दोन भाग करावे.  त्याप्रमाणे कामवितर्क (विषयवितर्क), व्यापादवितर्क (द्वेषवितर्क) आणि विहिंसावितर्क (दुसर्‍याला किंवा आपणाला त्रास देण्याचा वितर्क), ह्या तीन वितर्कांचा मी एक विभाग केला; आणि नैर्ष्कम्य (एकान्तवास), अव्यापाद (मैत्री) आणि अविहिंसा (त्रास न देण्याची बुद्धि) या तीन वितर्कांचा दुसरा विभाग केला.  त्यानंतर  मी मोठ्या सावधगिरीने व दक्षतेने वागत असतां पहिल्या तीन वितर्कांपैकी एखादा वितर्क माझ्या मनांत उत्पन्न होत असे.  त्या वेळीं मी विचार करीत होतों की, हा वाईट वितर्क माझ्या मनांत उत्पन्न झाला आहे.  तो माझ्या दुःखाला, दुसर्‍याच्या दुःखाला किंवा उभयतांच्या दुःखाला कारणीभूत होईल, प्रज्ञेचा निरोध करील, व निर्वाणाला जाऊं देणार नाही.  या विचाराने तो वितर्क माझ्या मनांतून नाहीसा होत असे.

''भिक्षू हो, शरदृतूंत जिकडे तिकडे शेतें पिकाला आलीं असतां गुराखी गुरांचें मोठ्या सावधगिरीने रक्षण करतो; काठीने बडवून देखील त्यांना शेतांपासून दूर ठेवतो.  कां की, तसें केले नाही तर गुरें लोकांच्या शेतांत शिरतील, आणि आपणाला दंड भरावा लागेल, हें तो जाणतो.  त्याप्रमाणें काम, व्यापाद, विहिंसा इत्यादिक अकुशल मनोवृत्ति भयावह आहेत हें मी जाणलें.

''त्या वेळीं मी मोठ्या सावधगिरीने आणि उत्साहाने वागत असतां माझ्या मनांत नैष्कर्म, अव्यापाद आणि अविहिंसा ह्या तीन वितर्कांपैकी एखादा वितर्क उत्पन्न होत असे.  तेव्हा मी असा विचार करीत होतों की हा कुशल वितर्क माझ्या मनांत उत्पन्न झाला आहे, तो आपणाला, परक्याला किंवा उभयतांना दुःख देणारा नव्हे, प्रज्ञेची अभिवृद्धि करणारा व निर्वाणाला पोचविणारा आहे.  त्याचें सर्व रात्र किंवा सर्व दिवस चिंतन केलें तरी त्यापासून भय नाही.  तथापि पुष्कळ वेळ चिंतन केलें असतां माझा देह श्रान्त होईल, आणि त्यामुळे माझें चित्त स्थिर राहणार नाही.  आणि अस्थिर चित्ताला समाधि कोठून मिळणार ?  म्हणून (कांही वेळाने) माझें चित्त मी अभ्यन्तरींच स्थिर करीत असें....एखादा गुराखी उन्हाळ्याच्या शेवटीं पिकें लोकांनी घरीं नेल्यावर गुरांना खुशाल मोकळें सोडून देतो.  तो झाडाखाली असला किंवा मोकळ्या जागेत असला तरी गाईवर नजर ठेवण्यापलीकडे दुसरें कांही करीत नाही.  त्याप्रमाणे नैर्ष्कम्यादिक कुशल वितर्क उत्पन्न झाले असतां हे कुशल धर्म आहेत एवढीच मी स्मृति ठेवीत होतों.  (त्यांचा निग्रह करण्याचा प्रयत्‍न करीत नसें.)''

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 1 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 5 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 7 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 8 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 11 आर्यांचा जय 1 आर्यांचा जय 2 आर्यांचा जय 3 आर्यांचा जय 4 आर्यांचा जय 5 समकालीन राजकीय परिस्थिति 1 समकालीन राजकीय परिस्थिति 2 समकालीन राजकीय परिस्थिति 3 समकालीन राजकीय परिस्थिति 4 समकालीन राजकीय परिस्थिति 5 समकालीन राजकीय परिस्थिति 6 समकालीन राजकीय परिस्थिति 7 समकालीन राजकीय परिस्थिति 8 समकालीन राजकीय परिस्थिति 9 समकालीन राजकीय परिस्थिति 10 समकालीन राजकीय परिस्थिति 11 समकालीन राजकीय परिस्थिति 12 समकालीन राजकीय परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 1 समकालीन धर्मिक परिस्थिति 2 समकालीन धर्मिक परिस्थिति 3 समकालीन धर्मिक परिस्थिति 4 समकालीन धर्मिक परिस्थिति 5 समकालीन धर्मिक परिस्थिति 6 समकालीन धर्मिक परिस्थिति 7 समकालीन धर्मिक परिस्थिति 8 समकालीन धर्मिक परिस्थिति 9 समकालीन धर्मिक परिस्थिति 10 समकालीन धर्मिक परिस्थिति 11 समकालीन धर्मिक परिस्थिति 12 समकालीन धर्मिक परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 14 गोतम बोधिसत्त्व 1 गोतम बोधिसत्त्व 2 गोतम बोधिसत्त्व 3 गोतम बोधिसत्त्व 4 गोतम बोधिसत्त्व 5 गोतम बोधिसत्त्व 6 गोतम बोधिसत्त्व 7 गोतम बोधिसत्त्व 8 गोतम बोधिसत्त्व 9 गोतम बोधिसत्त्व 10 गोतम बोधिसत्त्व 11 गोतम बोधिसत्त्व 12 गोतम बोधिसत्त्व 13 गोतम बोधिसत्त्व 14 तपश्चर्या व तत्वबोध 1 तपश्चर्या व तत्वबोध 2 तपश्चर्या व तत्वबोध 3 तपश्चर्या व तत्वबोध 4 तपश्चर्या व तत्वबोध 5 तपश्चर्या व तत्वबोध 6 तपश्चर्या व तत्वबोध 7 तपश्चर्या व तत्वबोध 8 तपश्चर्या व तत्वबोध 9 तपश्चर्या व तत्वबोध 10 तपश्चर्या व तत्वबोध 11 तपश्चर्या व तत्वबोध 12 तपश्चर्या व तत्वबोध 13 तपश्चर्या व तत्वबोध 14 तपश्चर्या व तत्वबोध 15 श्रावकसंघ 1 श्रावकसंघ 2 श्रावकसंघ 3 श्रावकसंघ 4 श्रावकसंघ 5 श्रावकसंघ 6 श्रावकसंघ 7 श्रावकसंघ 8 श्रावकसंघ 9 श्रावकसंघ 10 श्रावकसंघ 11 श्रावकसंघ 12 श्रावकसंघ 13 श्रावकसंघ 14 श्रावकसंघ 15 श्रावकसंघ 16