भाग ३
...की, सिंहाची डरकाळी आठ ते दहा मैलां पर्यंत ऐकू येते?
Panthera leoP1040181.JPG
...की, फ्रांस या देशात एकही डास नाही?
...की, तुर्कीमधील इस्तंबूल जगातील एकमेव असे शहर आहे जे आशिया व युरोप या दोन खंडांत विसावले आहे?
...की, जिराफाच्या पाठीत जेवढे मणके असतात (सहा) तेवढेच मणके उंदराच्या पाठीत असतात?
...की, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी ज्वालामुखी मंगळावर आहे. या ज्वालामुखीची उंची २६.४ कि.मी. आहे?
...की, जगातील सर्वात खोल जागा प्रशांत महासागरातील मरियाना ही आहे. हिची खोली ११ कि.मी. एवढी आहे?
...की, आपल्या चाव्यांनी माणसाला हैराण करणाऱ्या डासांना दात नसतात?
...की, ताजमहालाचा रंग सकाळी गुलाबी, दुपारी पांढरा तर रात्री सोनेरी दिसतो?
...की, सहारा वाळवंटातील तापमान सकाळी ४५ अंश सेल्सियस असते तर रात्री ते ५ अंश सेल्सियस पर्यंत उतरते?
...की, शुक्र हा ग्रह हा पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे तेथे सूर्य हा पश्चिमेकडे उगवतो व पूर्वेकडे मावळतो?
...की, पी.टी. उषा हीचे पूर्ण नाव पीलुवालकंडी टेकापरवील उषा असे आहे?
...की, बिल गेट्स प्रत्यक सेकंदाला १२००० रूपये व एका दिवसात १०३ कोटी रूपये कमावितो?
...की, ज्या हाताने तुम्ही लिहीता त्या हाताच्या बोटाची नखे सगळ्यात जास्त वेगाने वाढतात?
...की, फक्त मनुष्य हा प्राणीच पाठीवर झोपू शकतो?
...की इ.स. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये पोलंडमधील नाझी राजवटीच्या काळातील ऑश्विझ छळछावणीत विषारी वायूच्या चेंबरमध्ये कोंडून युध्दकैद्यांना ठार करणे थांबवले गेले.
सबॉबा
...की दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉंब टाकण्याचा निर्णय अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांचा होता.
...की ३१ डिसेंबर, इ.स. १८०२ रोजी मराठा साम्राज्यातील दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या वसईच्या तहाने दुसर्या इंग्रज-मराठा युद्धाची ठिणगी पडली.
सबॉबा
...की अशोकाच्या शिलालेखात नमूद केल्याप्रमाणे कलिंगच्या युद्धातील प्रचंड जिवितहानी पाहिल्याने सम्राट अशोक याने परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.
...की नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील गुराखीगडावर दरवर्षी आगळेवेगळे गुराखी साहित्य संमेलन भरवले जाते.
...की जतीन दास व पोट्टी श्रीरामुलु या दोघांचा मृत्यू त्यांच्या आमरण उपोषणादरम्यान झाला.