Get it on Google Play
Download on the App Store

भुमिका


पुनर्जन्म एक तात्विक किंवा धार्मिक संकल्पना आहे, ज्या नुसार एक शरीर मृत झाल्यावर त्यातील आत्मा हा नवीन कायाप्रवेश किंवा नवीन शरीरात प्रवेश करून नवे जीवन सुरु करू शकतो. ही संकल्पना हिंदू धर्मातील एक प्रमुख अशी विचारसरणी आहे. बुद्ध धर्मात दुसऱ्या जन्माच्या कल्पनेला पण पुनर्जन्म म्हटलं जातं. सॉक्रेटीस, प्लेटो आणि पायथागोरस सारख्या महान व्यक्तींचा देखील या संकल्पनेवर विश्वास होता. हा अनेक पुरातन तसेच आधुनिक धर्म जसे की अध्यात्म, ब्राम्हविद्या आणि एकांकर यांचादेखील भाग आहे आणि पूर्व आशिया, सायबेरिया, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये ठिकठिकाणी वसत असलेल्या जमातींचा अविभाज्य घटक आहे.

आता यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लीम पैकी बहुतेक गट पुनर्जन्म मान्य करत नाहीत, तरीही यातील काही गट पुनर्जन्माच्या संकल्पनेवर श्रद्धा ठेवतात. कब्बाला, कैथर, द्रूजे आणि रोजीक्रुशनस चे ऐतिहासिक आणि समकालीन शिष्य या गटात येतात. गेल्या काही दशकांत युरोप आणि उत्तर अमेरिकेतल्या बऱ्याच लोकांनी पुनर्जन्माच्या विषयात स्वारस्य दाखवलं आहे. समकालीन चित्रपट, कथा - कादंबऱ्या आणि अनेक लोकप्रिय गाणी यांमधेही अनेक वेळा पुनर्जन्माचा उल्लेख आढळतो.