नेव्हीचा लढवैया वैमानिक - जेम्स ३
फार कमी वयातच जेम्स लेंइंगेरला आपले नेव्हीतील लढाऊ वैमानिकाचे आयुष्य आठवू लागले. तो केवळ विमानाच्या खेळण्यांनीचं खेळत असे आणि नंतर तीच त्याची आवड बनली. तो खूप अस्वस्थ राहू लागला, आणि केवळ विमानं, हत्यारं आणि विमान अपघाताच्या गोष्टी बोलू लागला. ३ वर्षांचा असतानाच त्याने आपल्या आईला सांगितले की लढाऊ विमानाचा ड्रोप टांकी म्हणजे काय असतं आणि हेही सांगितलं की एका वैमानिकाप्रमाणेच तो एखाद्या विमानाची चाचणी करू शकतो.
त्याने आपल्या वडिलांना सांगितलं की तो नतोमा नावाचे विमान उडवायचा आणि त्याच्या सहाय्यकाच नाव जैक लार्सन होतं. नतोमा खरोखरीच पासिफिकचं एक विमान होतं आणि लार्सन तेव्हा जिवंत होता. जेव्हा जेम्सने सांगितलं की त्याचा मृत्यू लवो जिमा इथे आपल्या विमानात झाला होता, त्याच्या वडिलांनी याबाबत शोध घेतला. तेव्हा समजलं की जेम्स एम हस्टन जूनियर नावाच्या वैमानिकाचा तिथे मृत्यू झाला होता. जेम्सने "जेम्स ३" या नावाने स्वाक्षरी करण्यास सुरुवात केली होती. हि एक घोटाळ्यात टाकणारी गोष्ट होती. जेम्सच्या कुटुंबीयांनी हस्टनच्या बहिणीशी संपर्क साधला. तिने हस्टनच्या मृत्युनंतर नेव्हीने पाठवलेलं खेळण्यातलं विमान जेम्सला भेट म्हणून पाठवलं.