Get it on Google Play
Download on the App Store

मुलभूत व्याख्या

पुनर्जन्म  म्हणजे रिइन्कार्नेषन हा लैटीन भाषेतून उगम असलेला शब्द ज्याचा अर्थ आहे पुन्हा शरीरात प्रवेश करणे. त्याचप्रमाणे एक ग्रीक भाषेतील शब्द आहे जो नेहमी वापरला जातो तो आहे पल्लीनजेनेसिस ज्याचा अर्थ आहे पुन्हा जन्म घेणे. पाली आणि संस्कृत सारख्या पारंपारिक भाषांमध्ये रीबर्थ,ट्रान्समायग्रेशन, मेटासायकोसिस किंवा रीइन्कार्नेषन सारख्या इंग्रजी शब्दांशी साधर्म्य असलेला एकही शब्द नाही. हि संपूर्ण प्रक्रिया जी मृत्यू, जन्म आणि पुनर्जन्म प्रणालीला चालवते तिला कर्म चालवते आणि त्याचे नाव आहे समसार. आणि ज्या दशेत व्यक्ती जन्म घेतो त्या दशेला आपण जन्म किंवा जति अस म्हणतो. देव (BHAGWANT) देखील मरून पुन्हा जन्म घेतात. इकडे पुनर्जन्म हे संकल्पना पूर्णपणे लागू होत नाही परंतु हिंदू देवतांनी पुनर्जन्म घेतला आहे. भगवान विष्णू आपल्या  दहा  अवतारांसाठी लोकप्रिय आहेत. अनेक ख्रिस्ती लोक येशू ला एक अलौकिक अवतार मानतात. अनेक ख्रिस्ती किंवा मुस्लीम मानतात कि पैगंबर पुन्हा जन्म घेणार आहेत. अनेक ख्रिस्ती मानतात कि येशू जगाच्या अंताच्या वेळी पुन्हा जन्म घेणार आहे परंतु त्याला पुनर्जन्म नाही म्हणू शकत.