Get it on Google Play
Download on the App Store

पास्ट लाइफ रिग्रेशन

या तंत्राच्या आधारे संमोहनाच्या मदतीने चिकित्सक पुनर्जन्म आणि पूर्व जन्मातील आठवणी जाग्या करतात, परंतु बहुतांश लोक याला काल्पनिक मानतात. पास्ट लाइफ रिग्रेशन नेहेमीच एक अलौकिक अनुभव घेण्यासाठी किंवा मनोवैज्ञानिक कारणांसाठी वापरण्यात येते. अनेक चिकित्सक पुनर्जन्मावर चर्चा करतात, परंतु ज्या धार्मिक परंपरा पुनर्जन्मावर श्रद्धा ठेवतात, त्या मागच्या जन्मातील आठवणीबद्दल कोणतेच भाष्य करत नाहीत. पास्ट लाइफ रिग्रेशन मध्ये व्यक्तीच्या पूर्व जन्मातील घटना, आठवणी माहिती करून घेण्यासाठी तिला संमोहन अवस्थेत नेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे विचारली जातात. संमोहन आणि प्रश्नांचा भडीमार यामुळे अनेकदा व्यक्तीच्या आठवणी संभ्रमित होऊ शकतात. या आठवणींचा स्त्रोत कदाचित अर्धचेतानावस्था, ज्यात पूर्वीच्या घटना आठवण्यापेक्षाही अनुभव, ज्ञान, कल्पना आणि चिकित्सकाचे मार्गदर्शन हाच असतो. एकदा का या आठवणी पक्क्या झाल्या की त्यांना व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या वास्तव घटनांपासून वेगळे करणे अवघड बनते. पास्ट लाइफ रिग्रेशन मधून समोर आलेल्या घटनांचा अभ्यास केल्यावर काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्या इतिहासाच्या सामान्य ज्ञानानेही समजून घेता येऊ शकतात. ज्या व्यक्तींनी पास्ट लाइफ रिग्रेशन केले आहे त्यांच्या स्मृतींच्या संचयाला पुनर्जन्मावरचा विश्वास आणि चिकित्सकाचे मार्गदर्शन प्रामुख्याने कारणीभूत असतात.