Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्जन्मावर संशोधन

व्हर्जिनिया विश्वविद्यालयातील मनोवैज्ञानिक इयान स्टीवन्स यांनी अशा अनेक मुलांचा अभ्यास केला ज्यांना आपला मागील जन्म आठवत होता. त्यांनी ४० वर्षांत अशा जवळजवळ २५०० प्रकरणांचा अभ्यास केला आणि १२ पुस्तके लिहिली. " ट्वेंटी केसेस सजेस्टीव्ह ऑफ रीन्कोर्नाशन " आणि " वेयर रीन्कोर्नाशन एंड बायोलॉजी इंटरसेक्ट " ही त्यातलीच दोन आहेत. स्टीवन्स यांनी नीटनेटक्या पद्धतीने प्रत्येक मुलाचा अनुभव लिहिला आणि पूर्वाश्रमीच्या त्या संबंधित मृत व्यक्तींची माहिती शोधून मुलांच्या आठवणी आणि त्या मृत व्यक्तीचे जीवन यातील वस्तुस्थितीचा ताळमेळ घातला. रीन्कार्नाशन आणि बायोलॉजी मध्ये त्यांनी मुलांच्या शरीरावरील जन्मखुणा मृत व्यक्तीच्या जखमांशी जुळवून पहिल्या आणि शाव चिकीत्सेच्या फोटोंसारख्या मेडिकल रेकोर्डच्या मदतीने या सर्व गोष्टींची खात्री केली. जिम बी टकर , अन्तोनिया मिल्स , सतवंत पसरीचा , गोडविन समररत्ने ,  आणि एरलेंदुर हराल्द्सन यांनीही रीन्कार्नाशन शोधात भाग घेतला. पॉल एडवर्ड्स सारख्या शंकेखोर लोकांनी या सर्व गोष्टींचे विश्लेषण केले आणि त्या वास्तववादी किंवा वास्तवाशी संबंधित नाहीत असं म्हटलं, त्याचबरोबर पुनर्जन्माच्या या कल्पना व्यक्तीच्या मनातील भीती आणि विचारातून जन्माला येतात आणि त्याचमुळे त्याला सबळ मान्यता देता येत नाही असही म्हटलं.

 कार्ल सगन ने आपल्या " द डेमोन होंटएड वर्ल्ड " या पुस्तकात स्टीवनच्या शोधतील निश्कर्ष हे अत्यंत काळजीपूर्वक एकत्र केला गेलेला असा अनुभवी माहिती संग्रह असल्याचं मान्य केलं , पण पुनर्जन्म हा त्या कथांचा आधार आहे हे मान्य करण्यास नकार दिला. सैम हर्रिस ने " द एंड ऑ फे " या आपल्या पुस्तकात स्टीवनच्या लेखांना , एखाद्या व्यक्तीच्या मानसिक अनुभवांना समजून घेण्यासाठी वापरण्यात वापरण्यात येणाऱ्या माहितीत सामील केले.

इआन विल्सन ने अशी याचिका केली की स्टीवन च्या बहुतांश केसेस गरीब मुलांच्या आहेत ज्यांना श्रीमंत किंवा उच्च वर्गीय आयुष्याची आठवण येते , तेव्हा अशा केसेस म्हणजे पूर्व जन्मातील कुटुंबियांकडून पैसे उकळण्याचे मध्यम असू शकतात. रोबर्ट बेकर च्या संशोधनाप्रमाणे स्टीवेंसन आणि अन्य मनोवैज्ञानिकांकडून अभ्यासण्यात आलेल्या पुनर्जन्माच्या अनुभवांना मनोवैज्ञानिक घटकांच्या मदतीने समजून घेता येऊ शकते. तत्वज्ञ पॉल एडवर्ड्स याचं असं म्हणणं आहे की पुनर्जन्म केवळ समजुती आणि अटकळी यांचा खेळ आहे आणि आधुनिक विज्ञानात त्याला अजिबात स्थान नाही. पुनर्जन्माच्या विरोधातील याचिकांमध्ये अशी काही तथ्य सामील आहेत जी सांगतात की बहुतांश लोकाना आपला मागील जन्म आठवत नाही आणि आधुनिक विज्ञानात असा कोणताही मार्ग नाही ज्या द्वारे माणूस मृत्यू टाळून दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकेल. स्टीवेंसन सारख्या संशोधकांनी देखील या मर्यादा मान्य केल्या आहेत.