Get it on Google Play
Download on the App Store

गणित एके गणित

शाळकरी वयापासून या पुस्तकाने व गणित या एकाच विषयाने रामानुजमला झपाटून टाकलेले होते. कॉलेजमध्ये गेल्यावर इतर कोणत्याच विषयात त्याला रस वाटेना. परिणामी शिष्यवृत्ति मिळवणारा हा विद्यार्थी कॉलेजात चक्क नापास होऊ लागला. इंग्लिश बऱ्यापैकी येत असूनहि त्याही विषयात नापास! एक दोन वर्षे असे चालून अखेर शिष्यवृति बंद झाली व गरिबीमुळे कॉलेज सोडून घरी बसावे लागले. शिक्षण संपले पण गणिताचा अभ्यास चालूच होता. नोकरी शोधावी तर शिक्षण अर्धवट त्यामुळे काही जमेना. किरकोळ कामे करणे व गणित शिकवणे यावर कसेबसे चालले होते. गणित शिकवणेहि साधारण विद्यार्थ्याच्या डोक्यावरून जाणारे. गणितातला तज्ञ अशी त्याची कीर्ति झाली होती व त्या विषयात रस असलेल्या अनेकांशी मैत्री झाली होती. गणिताचा अभ्यास जोरात चालू होता व नवनवीन मूलगामी तत्वे, फॉर्म्युले, प्रमेये त्याला सुचत होती व स्फुरत होतीं. त्याच्या वह्या भरून जात होत्या. मात्र कोणत्याही प्रमेयाची सिद्धता तो पायरीपायरीने लिहीत नव्हता, ते बरोबर आहेच असा त्याचा ठाम विश्वास असे!