हार्डी
हार्डी हा जगप्रसिद्ध गणितज्ञ, शिक्षकी पेशाच्या आईबापांचा मुलगा, मध्यमवर्गीय, क्रिकेटची आवड असणारा, अंतर्बाह्य ब्रिटिश, केंब्रिज विद्यापीठाचा फेलो, अशा व्यक्तिमत्वाचा होता. रामानुजमच्या पत्रात त्याला त्याच्या असामान्य प्रतिभेच्या खुणा दिसत होत्या. त्याने त्याचे वजन वापरण्याचे ठरवले. ब्रिटिश सरकारचे इंडिया ऑफिस, मद्रासचा गव्हर्नर, मद्रास युनिव्हर्सिटी या सर्व ठिकाणी त्याने रामानुजमला मद्रास युनिव्हर्सिटीने शिष्यवृत्ति द्यावी यासाठी आग्रह चालवला.