Get it on Google Play
Download on the App Store

पहिले महायुध्द


पहिली दोन वर्षे साधारण बरी गेली पण नंतर पहिले महायुद्ध सुरू झाले व मग सर्वच वस्तूंची भीषण टंचाई वाढत गेली व हाल होऊ लागले. दोन वर्षांनंतर त्याला शिष्यवृत्ति वाढवून मिळाली. मात्र युद्ध सुरू असल्यामुळे भारतात परत येणे शक्य नव्हते. केंब्रिजमध्येहि खूप बदल झाले. विद्यार्थी व अध्यापकही सैन्यात भरती होऊ लागले. नवीन विद्यार्थी कमी झाले. कॉलेजच्या आवारातच एक हॉस्पिटल सुरू झाले. जखमी सैनिक तेथे मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. बॉंबहल्ले नव्हते पण वातावरण पूर्ण युद्धमय झाले..