रामानुजम
अखेरचे संशोधन जगभरच्या गणितज्ञाना मिळाले व पुढील कित्येक दशके त्या कागदांचा अभ्यास व त्याच्या प्रमेयांच्या सिद्धता तपासणे हे काम त्याना पुरले व कित्येकाना त्यातून डॉक्टरेट मिळाली.रामानुजमचे चरित्र वाचून तो भारतीय असल्याचा अभिमान वाटतो पण त्याच्या अपमृत्यूमुळे मन विषण्ण होते. त्याचा सच्चा मित्र व मार्गदर्शक हार्डी याला रामानुजमबद्दल फार आदर व अभिमान होता. त्याच्या माहितीच्या नव्या-जुन्या, इंग्लिश वा युरोपियन, अनेक गणितज्ञांपेक्षा तो रामानुजमची योग्यता जास्त मानी. समोर मांडलेला गणितातील सिद्धान्त कळणारे, तपासून पाहून बरोबर-चूक ठरवू शकणारे पुष्कळ मिळतील पण सर्वस्वी नवीन तत्त्व वा प्रमेय वा सिद्धांत सुचणारा वा स्फुरणारा रामानुजमसारखा फार विरळा असे तो म्हणे. यांतच रामानुजमची सर्व थोरवी आली असे म्हणता येईल.