अखेर शिष्यवृत्ती मिळाली
युनिव्हर्सिटीला प्रश्न पडला कीं शाळेच्या पुढे न शिकलेल्या व्यक्तीला संशोधन शिष्यवृत्ति कशी काय द्यावी? पण हार्डी साहेब आग्रह धरतो आहे त्याला नाही कसे म्हणावे? व्हाइस चॅन्सेलरने अखेर दाखवून दिले कीं संशोधनाला उत्तेजन देणे हे घटनेप्रमाणे आपले काम आहे व हा इसम या कामाला योग्य आहे असे खुद्द हार्डीसाहेब म्हणतो आहे तेहा शंका घेणारे आपण कोण? अखेर युनिव्हर्सिटीने रामानुजमला महिना ७५ रुपयांची शिष्यवृत्ति मंजूर केली. आतां गणिताला सर्व वेळ देण्यास रामानुजम पूर्ण मोकळा झाला