4. महाश्वेता
महाश्वेता हे सुधा मूर्ती यांचे पुस्तक अनुपच्या आत्मविश्वास , जिद्द आणि चिकाटी यांचे रंजक चित्रण आहे. आयुष्यात येणारी प्रलोभने आणि प्रसंगी होणारा विश्वासघात यातून वाट काढत जाणारी अनुपमा प्रत्येक स्त्रीला एक निराळीच प्रेरणा देऊन जाते. अनुपमला कोड आहे याचे निदान होताच तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ उठते. त्यामुळे तिचा पति अनुपमचा त्याग करतो. त्वचेवर कोड उठलेल्या आणि नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीची समाजात होणारी विटंबना हृदय हेलावून टाकते. परंतु रात्री नंतर दिवस असतोच..! एकाकी पडलेली अनुपमा मुंबई गाठते जिकडे तिला यश,मानमरातब प्राप्त होते.विस्कटलेल्या आयुष्याची घडी पुन्हा बसवण्यास ती सक्षम होते.