20. हाउ द ओनियन गॉट ईटस् लेयर्स
हाउ द ओनियन गॉट ईटस् लेयर्स या पुस्तकात आपल्याला कांद्याशी निगडित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. जसे की कांद्याला इतकी आवरणे का आहेत? कांदा चिरताना किंवा कापताना डोळ्यातुन पाणी का येते? या पुस्तकातुन सुधा मुर्तीं यांनी छोट्या मुलांसाठी साधी परंतु अद्वितीय आणि रोमांचकारी उत्तरे दिली आहेत. लहान मुलांना या जगा बद्दल अधिक कुतुहल निर्माण करुन देण्यासाठी हे पुस्तक वाचायला देणे आवश्यक आहे. प्रत्येक उत्तरात खुपच रंजक स्पष्टीकरण दिल्याने या पुस्तकाबद्दल लहान मुलांच्या मनात कुतुहल निर्माण होते.