11. द मदर आय नेव्हर न्यु
द मदर आय नेव्हर न्यु हे पुस्तक म्हणजे दोन रंजक लघु कथांचा खजिना आहे. ह्या कथांमध्ये दोन माणसांची आयुष्य रेखाटली आहेत. आपल्या आयुष्यात अचानक समोर आलेल्या काही रहस्यांचा उलगडा करण्यासाठी त्या दोन्ही व्यक्तिरेखांची चाललेली धडपड यात दिसते. खर््या आईला भेटायची त्यांची धडपड आहे. हे पुस्तक म्हणजे दुखः किंवा दया निर्माण करणारे आणि जरा कल्पनेपलिकडचे आहे.हे पुस्तक थेट आपल्या ह्रदयाला जाऊन भिडते. हे पुस्तक वाचताना आपण आपल्या प्रियजनांशी कसे वागतो हा विचार एकदा मनात येऊन जातो.