14. द सर्पन्टस् रिवेंज: अनयुजवल टेलस् फ्रॉम द महाभारता
द सर्पन्टस् रिवेंज: अनयुजवल टेलस् फ्रॉम द महाभारता हे पुस्तक म्हणजे भारतातील सर्वात मोठे महाकाव्य महाभारत याची सुधा मुर्तीं यांनी नव्याने करुन दिलेली ओळख आहे. या पुस्तकातील नव्याने उलगडत जाणाऱ्या गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या आणि काहीसे चक्रावुन सोडणाऱ्या आहेत. यातील काही अज्ञात कथा म्हणजे चंद्रहासाची कथा, बाब्रुवहनाची कथा (अर्जुनाचा पुत्र ज्याने आपल्या पित्याला मारले), सुवर्ण मुंगुसाची कथा, दुर्योधनाचा भाऊ विकर्ण याची कथा, घटोत्कचाचा पुत्र बारबारिक याची कथा. या कथा आपल्याला माहिती असलेल्या महाभारतापेक्षा वेगळ्या आणि रंजक आहेत.