6. द डे आय स्टॉपड् ड्रिंकिंग मिल्क
द डे आय स्टॉपड् ड्रिंकिंग मिल्क हे पुस्तक सुधा मुर्तिंच्या ह्रदयस्पर्शी अनुभवांची साठवण आहे.सुधा मुर्तिंनी जेव्हा ग्रामीण आणि शहरी भारताची सफर केली तेव्हा त्यांना तफावत जाणवली. तेथे आलेले अनुभव यात सांगितले आहेत. त्यांनी स्त्री- पुरुषांच्या दैनंदिन जीवनातले काही प्रसंग लघुकथांमध्ये छान गुंफले आहे. प्रत्येक कथेची सांगता आपल्याला काहीतरी अविस्मरणीय बोध देउन जाईल अशी होते. या पुस्तकातील लक्ष वेधुन घेणारी कथा म्हणजे त्या ओरिसाला गेलेल्या असतानाची आहे. त्यामध्ये तेथील गरीब स्थानिक आदिवासी यांच्या जीवनाचा सारांश आहे. या पुस्तकाचा "आयुष्याचे धडे गिरवताना" असा मराठी अनुवाद ही उपलब्ध आहे