Get it on Google Play
Download on the App Store

कार्व्हर

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे एक अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ आणि आविष्कारक आहेत. त्यांनी लोकांना कापसाला पर्यायी पिक पिकवण्यास प्राधान्य द्यायला सांगितले. त्यांनी मातीची धूप थांबवण्यासाठी काही पद्धती सांगितल्या.ते 20 व्या शतकाच्या सुरुवातीचे महत्वाचे शास्त्रज्ञ होते. ते आफ्रिकन अमेरिकन कृष्णवर्णीय  समाजाचे होते. ते जन्माला आले तेव्हा अमेरिकेत कृष्णवर्णीय समाजाच्या व्यक्तीला शिक्षणाचे अधिकार नव्हते. या परिस्थतीवर मात करत कार्व्हर यांनी शिक्षण घेतले.त्यांच्या संघर्षाचा इतिहास या पुस्तकात दिला आहे.

जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर हे  टस्कीगी महाविद्यालयात शिक्षक होते. तेथे शिकवत असताना कार्व्हर यांनी  कापसच्या वारंवार लागवडीमुळे जमिनींची गुणवत्ता खालावते, अभ्यासले होते. म्हणुन त्यांनी जमिनीची गुणवत्ता चांगली करण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत केले.कार्व्हर यांना नेहमी वाटत असे की गरीब शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात कापसा व्यतिरिक्त शेंगदाणे , रताळी अशी पिके हि घ्यावीत. या पिकांच्या लागवडीमुळे शेतकर्‍याला स्वतःच्या खाण्यसाठी ही काहीतरी मिळेल आणि चांगल्या खाण्यामुळे त्यांचे जीवनमान काहीसे चांगले होईल.

कार्व्हर यांनी शेतकर्‍याचे आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न केलेच शिवाय ते पर्यावरणवादाचा प्रसार करणारे नेते होते. कार्व्हर यांना त्यांच्या कामांसाठी अनेक पुरस्कारंनी गौरवण्यात आले आहे. त्यांना स्पिनगर्न मेडल ऑफ द नॅशनल असोसिएशन फॉर दी अॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पिपल हा पुरस्कार ही दिला आहे. जाती पातीच्या आणि वर्णद्वेषाच्या युगात, त्यांची प्रसिद्धी कृष्णवर्णीय समुदायाच्या ही बाहेर गेली होती.कार्व्हर यांनी अनेक यशांची शिखरे काबिज केली होती. त्यांच्या कार्यांची अाणि त्यांच्या प्रतिभेची फक्त कृष्णवर्णीय समुदायाने नव्हेच तर श्वेतवर्णीयांनी ही दखल घेतली होती आणि कौतुक ही केले होते. सन १९४१ साली "टाईम मॅगझिन" ने कार्व्हर यांना "ब्लॅक लिओनार्डो" असा किताब दिला होता.

अॅलेन अॅलेक्झँडर या आफ्रिकन अमेरिकन सर्जन ने १९३७ साली टस्कीगी महाविद्यालयात कार्व्हर यांच्यावर एक रंगीत चित्रपट चित्रतीत केला होता. हा चित्रपट नंतर २०१९ साली नॅशनल फिल्म रेजिस्ट्री ऑफ द लायब्ररी ऑफ काँग्रेस या मध्ये सामील करुन घेतला होता.यामध्ये कार्व्हर यांची १२ मिनिटांची चित्रफित होती यात त्यांचे घर , ऑफिस आणि प्रयोगशाळा यांच चित्रिकरण केले होते. त्याच बरोबर यामध्ये कार्व्हर यांचे फुलांच्या बागेतील फोटो ,आपली पेंटिंग दाखवतानाचे फोटो ही होते.हा चित्रपट द नॅशनल आर्चिव यांनी संगणकीकृत (डिजिटलाईज्ड) केला होता. ऐतिहासिक महत्व असलेला, अनेक वर्षांच्या मेहनतीने जोपासलेला असा हा  चित्रपट द नॅशनल पार्क सर्विस यांच्या चित्रपट संग्रहामध्ये उपलब्ध करुन दिला आहे. हा चित्रपट युएस नॅशनल फिल्म अर्चिव या युट्युब चॅनलवरही आहे.