Get it on Google Play
Download on the App Store

ख्रिस्त आणि कार्व्हर

कार्व्हरना नेहमी देव आणि विज्ञान यांची सांगड घालायला आवडत असे. त्यांनी त्यांच्या भाषणात बऱ्याचदा सांगितले होते

कि येशू वरील श्रद्धे मुळे त्यांना विज्ञानाची कास धरायला मदत होते. कार्व्हर यांना जगाची माहिती ही नव्हती तेव्हा त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.

सन १९३१ साली झालेल्या संभाषणात ते सांगतात कि, “ मी केवळ दहा वर्षांचा होतो. काही फार मोठी खाणी नाही त्यामागे.

येशू एकदा माझ्या जवळ आले जेव्हा मी आमच्या झोपडीत पोटमाळ्यावर क्ले सोलत होतो.

ते मके आम्ही गिरणीत दळायला नेणार होतो.माझ्या आयुष्यातील येशू म्हणजे माझ्या शेजारी राहणाऱ्या श्वेतवर्णीयांचा लहान मुलगा होता.

एका शनिवारी सकाळी तो माझ्याकडे खेळायला आला. तेव्हा त्याने मला सांगितले कि रविवारी तोः शाळेत जाणार आहे.

मला रविवारच्या शाळेची उत्सुकता लागली होती. त्याने सांगितले कि ते रविवारी शाळेत प्रार्थना म्हणतात.

मला प्रार्थना म्हणजे काय हे माहिती नव्हते, त्याने काय प्रार्थना तेव्हा सांगितली हे माझ्या आता लक्षात नाही पण मला इतके आठवते

कि मी जसा तो निघून गेला तसा तडक आमच्या झोपडीच्या पोटमाळ्यावर गेलो आणि तिथे एका मक्याच्या पिंपाजवळ घुडग्यांवर बसलो होतो.

मला शक्य होते आणि तेव्हा जितकी समजली होती तितकी प्रार्थना मी केली. मला आठवते तेव्हा मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच कृष्णवर्णीय होतो.

त्यामुळे चर्च, रविवारची शाळा असे काही आम्ही पहिले नव्हते. त्यामुळे माझे ख्रिस्ती धर्मांतर सोप्पे होते.

आणि इतकी वर्षे प्रार्थना करण्याचे सोडायच्या आधी मी या धर्मावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा प्रयत्न केला.”

मजकूर त्यांनी इसाबेल कोलमन यांना २४ जुलै १९३१ साली लिहिलेल्या पत्रात नमूद केला होता.

कार्व्हर यांना आपण आपल्या एकविसाव्या वाढदिवसानंतर जगू असे शक्य वाटत नव्हते. 
याचे कारण त्यांची खालावणारी प्रकृती होती. कार्व्हर यांनी नेहमी येशु ख्रिस्ताला वंशीय भेदभाव 
आणि सामाजिक स्तरीकरण, वांशिक कलह याच्यातील दरी कमी करणारा दुवा आहे असे मानून त्यावर विश्वास ठेवला होता. 
कार्व्हर यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास बरोबर नैतिक विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले होते. 
यासठी त्यांनी विद्यार्थ्यांना आठ तत्वे सांगितली होती.
 
हे नियम मिसुरीच्या सेंट लुईस यांच्या वनस्पतीशास्त्रीय उद्यानात कार्व्हर यांच्या समाधीवर लिहिले आहेत. 

ते नियम असे कि-
१.नेहमी अंतर्बाह्य स्वच्छ रहावे.
२.कधीही श्रीमंताची श्रीमंती आणि गरीबाची गरिबी पाहू नये.
३.कुणाची ही पिळवणूक करू नका
४.कुणाकडून हिसकावून घेऊन जिंकू नका.
५.नेहमीच महिला, मुले आणि वृद्ध लोकांचा विचार करा.
६.खोटे बोलायचे असेल तर खूप शूर व्हा
७.फसवणूक करायची असेल तर खूप उदार व्हा
८.जगातील आपला वाटा आपण उपभोगा आणि इतरांना त्यांचा वाटा उपभोगू द्या.

सन १९०६ ला टस्केगी मध्ये असताना सुरुवातीच्या काळात कार्व्हर दर रविवारी बायबलचे वर्ग घेत असे. 
कार्व्हर हे वर्ग केवळ तेथील विद्यार्थ्यांच्या विनंतीमुळे घेत असे. 
ते विद्यार्थ्यांना नाटकीय रुपांतरण करून दाखवायला सांगत असे. 

त्यांच्यावर अनेकदा यामुळे टीका झाल्या. त्यांनी टीकाकारांना सांगताना म्हणले आहेत कि, 
“तुम्ही काही सामान्य गोष्टी असामन्य पद्धातीने करता तेव्हा तुम्ही सार्या जगाचे लक्ष वेधून घेता”