प्रारंभिक आयुष्य
युवक जॉर्ज कार्व्हर हा मोझेस कार्व्हर यांच्या फार्म हाउस जवळ रहायचा जे १८८१ मध्ये बांधले गेले होते.कार्व्हर दुर्दैवाने गुलामगिरीत जन्मला होता. तो मिसुरी मधील न्युटन काऊंटी मधील डायमंड ग्रुव्ह म्हणजे आजचे डायमंड शहर येथे साधारणतः १८६० च्या आसपास जन्मला होता. त्यांचा जन्मदिवस अनिश्चित होता आणि स्वतः कार्व्हर यांनाही त्यांची माहीती नीटशी आठवत नसावी. कार्व्हर सांगतात की जन्मदिवस नक्कीच तेव्हा होता जेव्हा मिसुरीतुन गुलामगिरीचे सावट संपले नव्हते. अमेरिकेच्या इतिहासानुसार मिसुरी मधील गुलामगिरी १८६५ साली संपुष्टात आली जेव्हा अमेरिकेत यादवी युद्ध( सिव्हील वॉर) झाले होते. कार्व्हर यांचा मालक म्हणजे मोझेस कार्व्हर हा एक जर्मन अमेरिकन परदेशातून आलेला माणुस होता. मोझेस याने कार्व्हरची आई मेरी आणि वडिल गिलेज यांना व्हिलीयम पी मॅकगिन्निज या इसमा कडुन केवळ ७०० डॉलर देउन विकत घेतले होते. हा सौदा ९ ओक्टोबर १८५५ साली झाला होता. तेव्हाचे ७०० डॉलर म्हणजे आजचे किमान ७ लाख रुपये. तेव्हा इतके पैसे देउन मोझेस ने मात्र एक जोडपे आणि त्यांची सारी मुले इतके सारे आयुष्यभरासाठी विकत घेतले होते.
कार्व्हर च्या बालपणीचा एक किस्सा सांगितला जातो. कार्व्हर केवळ एका आठवड्याचं बाळ असेल तेव्हा तेथील कुख्यात टोळी 'नाईट रायडर्स ऑफ आर्कान्सास' यांनी कार्व्हरच्या आई आणि बहीणेचे अपहरण केले होते. कार्व्हरचा मोठा भाऊ जेम्स या टोळीच्या तावडीतून कसाबसा निसटला होता. अपहरणकर्त्याने या गुलामांना केंटकी शहरात विकले होते. याची खबर मोझेसला कळताच त्याने जॉर्ज बेंटली या इसमास कार्व्हरच्या परिवाराला शोधण्यास सांगितले. परंतु अथक परिश्रमांनंतर जॉर्ज बेंटली याला अपंग कार्व्हर या व्यतिरिक्त इतर कुणीही सापडले नव्हते.मोझेसने रायडर्स बरोबर वाटाघाटी करुन जॉर्ज कार्व्हर ला परत मिळवले आणि या कामगिरी बद्दल बेंटलीला चांगला इनाम दिला.गुलामगिरी १८५५ मध्ये नाहीशी झाली.यानंतर मोझेस कार्व्हर आणि त्यांची पत्नी सुझन यांनी जॉर्ज व जेम्स यांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवले.त्यांनी जॉर्जला त्याच्या बुद्धिमत्तेला तेज देइल अश्या शिक्षणाचा पाठपुरावा चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिले. शिवाय 'आंट सुझन' ने जॉर्जला मुलभूत वाचन आणि लिखाण शिकवले होते.
त्याकाळी डायमंड ग्रुव्ह येथे कृष्णवर्णीय लोकांना इतर श्वेतवर्णीयांच्या शाळेत जाण्यास सक्त मनाई होती.जॉर्ज ने आपल्या घरापासुन १० मैलांवर निओशो येथे असलेल्या शाळेत जायचे ठरवले. हि शाळा खास कृष्णवर्णीय लोकांसाठी होती. जॉर्ज आपल्या शाळेसाठी घरातून चालत निघाला होता. त्याला निओशो शहरात पोहोचेपर्यंत रात्र उजाडली आणि शाळा तोपर्यंत बंद झाली होती. आणि तो तिथेच जवळ असलेल्या एका गोदामात झोपला.त्याच्या नशिबाने दुसर्या दिवशी सकाळी त्याला एक दयाळु स्त्री भेटली. तिचे नाव मरिया वॉटकिनस् होते.त्याने मरियाला वास्तव्यासाठी भाड्याने खोली मागितली.तिने त्याचे नाव विचारता त्याने 'कार्व्हर यांचा जॉर्ज' असे सांगितले. आजपर्यंत तो तेच सांगत आला होता. पण मरियाने त्याला 'जॉर्ज कार्व्हर' असे संबोधले आणि इथुन पुढे त्याने आपले नाव असेच सांगावे हे सांगितले. "तु इतके शिक जितके जास्तित जास्त ग्रहण करु शकशील.पुढे जाउन या जगात इतर लोकांना ही तुझ्या ज्ञानाचा उपयोग होईल असे कार्य कर..!" ह्या मरियाच्या वाक्याने जॉर्ज च्या मनावर आणि आयुष्यावर एक छाप सोडली.
कार्व्हरची शिकायची ओढ त्याला वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी घरापासुन लांब घेऊन गेली. कार्व्हर कँन्सस मधील फोर्ट स्कॉट येथे एका परिवाराकडे राहिला होता. तेथे त्याने जे काही पाहिले अनुभवले त्यानंतर फोर्ट स्कॉट शहरच सोडले. त्याने श्वेतवर्णीयांनी कृष्णवर्णीयांची कत्तल करताना स्वतःच्या डोळ्यानी पाहिले आणि या शहराचा धसका घेतला. त्याने अनेक शाळांमधुन आपले शिक्षण पुर्ण केले. कार्व्हर ने त्याचा डिप्लोमा मिनेपोलिस च्या उच्च माध्यमिक शाळेतुन पुर्ण केला.