उत्तरार्ध
वरील पेंटिंग बेटसी ग्रेव्ह रेनेउ यांनी केले आहे.
कार्व्हर एके दिवशी कामावरुन घरी परतत होते. तेव्हा अचानक ते शिडीवरुन तोल जाउन पडले.त्यांना तिथे काम करणार्या त्यांच्या कामवाल्या बाईंनी हॉस्पिटल मध्ये नेले होते. कार्व्हर यांचा मृत्यु ५ जानेवरी १९४३ ला म्हणजे त्यांच्या वयाच्या ७८ व्या वर्षी झाला. त्यांचा मृत्युं हा शक्तिपाताने झाला असे निदान झाले. त्यांचे शव बुकर टी वोशिन्गटन यांच्या शेजारी पुरण्यात आले होते. कार्व्हर यांनी केलेल्या दानामुळे त्यांना ते एक कृष्णवर्णीय असुन त्यांना बुकर यांच्या शेजारी जागा मिळाली होती.
“ त्याला प्रसिद्धी बरोबर पैसे ही मिळवता आले असते परंतु त्याला दोन्हीची काळजी नसल्याने इतरांसाठी जगण्यात त्याला आनंद आणि सन्मान मिळत असे” हे त्यांच्या थडग्यावर लिहिले होते.