कारकिर्द
कार्व्हर एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं होण्याआधीच देशाचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रोजवेल्ट यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली होती. त्यांनी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख ही केला होता.
विलियम सी. एडनबॉर्न हे एक अमेरिकन शेतकरी आणि उद्योजक होते. त्यांनी कार्व्हर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या शेतात शेंगदाण्याचे उत्पन्न घेतले.
सन १९१६ साली "रॉयल सोसायटी ऑफ आर्टस्" या संस्थेचे ते सदस्य झाले. हि संस्था इंग्लंड मधली आहे. यामध्ये अगदी मोजकेच अमेरिकन जागा मिळवु शकले होते. त्यात एक नाव जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे होते. शेंगदाण्यांच्या अनेक प्रयोगांपैकी शेंगदाण्याचं दुध काढणे हा एक प्रयोग कार्व्हर यांनी केला होता.शेंगदाणा आणि सोयाबीन उत्पादकांना याची खबरच नव्हती. विलियम मेल्हुईश ने सोयाबीन आणि शेंगदाणा यांपासुन दुध बनवले. हा विक्रमी प्रकार दुधाला पर्याय ठरेल असे त्याने १९१६ साली सांगितले होते. या सोया मिल्कवर विलियम ने १२,४३,८५५ डॉलर कमावले.
द युनाईटेड पिनट असोसिएशन ऑफ अमेरिका यांनी कार्व्हरना भाषण करण्यासाठी आमंत्रित केले होते. कार्व्हर यांनी तिथे "पॉसिबिलिटी ऑफ पिनट" यावर प्रकाश टाकला. त्यांनी शेंगदाण्याची १४५ उत्पादने दाखवली.
कार्व्हर यांना अनेक लोकप्रिय लोकसाहित्य असलेल्या त्यांच्या अश्या शोधांना सन्मानित केले जाते जे कधीच त्यांच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडू शकले नाही. त्यांनी ते यशस्वीरीत्या बाजारात नाही आणू शकले.त्यांच्या नवे तीन पेटंट आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी बनवलेल्या अनेक पाककृती काही रासायनिक सूत्रे, त्यांच्या उत्पादनांच्या प्रोसिजर्स, यांची काहीच माहिती त्यांच्या प्रयोगशाळेतील वहीत नाही सापडली.कार्व्हर यांनी कापसाव्यातिरिक्त इतर नगदी पिके शेतकऱ्यांनी घ्यावी असा त्यांचा हेतू होता.