Get it on Google Play
Download on the App Store

प्रसिद्धी

"अमेरिकेच्या महान शास्त्रज्ञांनपैकी एक" अशा मथळ्याचे पोस्टर दुसर्‍या जागतिक युद्धाच्या वेळी म्हणजे साधारण १९४३ साली सर्वत्र लागले होते. कार्व्हरने कापसच्या वारंवार लागवडीमुळे माती झालेली झीज सुधारण्यासाठी तंत्र विकसित केले होते. अापल्या इतर शेती विषयातील ज्ञानी सहकार्यांबरोबर कार्व्हर यांनी शेतकर्‍यांना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पिकांची पेरणी ही आलटूनपालटून करावी असे सांगितले. कापसाच्या लागवडी बरोबर पर्यायी पिके म्हणुन रताळी किंवा शेंगदाणे, सोयाबीन , चवळी इ. शेंग पिके घेण्यास प्रवृत्त केले.या पिकांमुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण पुनर्संचयित होते. तसेच हि पिके माणसांनी खाण्यासाठी चांगली आहेत हे सांगितले.

कार्व्हर यांनी सुचवलेल्या या बदलांमुळे कापसासाठीच्या लागवडीसाठी वापरलेल्या जमिनिची प्रत सुधारली आणि शेतकर्‍यांना पर्यायी नगदी पिके घेता आली.  शेतकर्‍यांना पिकांच्या रोटेशन आणि पर्यायी लावणीचे वेळापत्रक यशस्वीपणे करता यावे म्हणुन प्रशिक्षण द्यायचे ठरवले. त्यांनी एक शेतकी विषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचे ठरवले जो अलबामातील शेतकर्‍यांसाठी होता. अगदी जसा त्यांनी लोवा स्टेट मध्ये राबवला होता. कार्व्हर यांनी काही पोषक आणि रुचकर  पाककृतीचे पुस्तक लिहिले त्यामुळे लोकांना इतर नगदी पिके घेण्यास प्रोत्साहन मिळेल अशी त्यांची भावना होती. कार्व्हर यांनी त्यांच्या सहायकांबरोबर एक प्रयोगशाळा शोधली जिथे ते शेती विषयक आणि उत्पादन वाढवण्यासाठी अनेक प्रयोग केले.शिवाय त्यांनी अनेक पाककृती शोधल्या आणि लोकांकडुन मिळवलचया होत्या. कार्व्हर यांच्या मते असे केल्यामुळे एखाद्या पिकाचा सर्वप्रकारे उपयोग होईल. त्यांनी या पाककृती "अॅग्रिकल्चर बुलेटीन" मध्ये प्रसारित केल्या.