व्यथा वडाची...
नको बांधू घट्ट
वड म्हणाला तिला,
नवऱ्यासारखा थोडा
श्वास घेऊ दे मला....
सात जन्मासाठी
सात फेरे मारले,
धाग्यामंध्ये गुंतवून
घट्ट किती बांधले....
कंटाळलो होतो मीही
उभं राहून उन्हात,
नाही फिरकलं एखादं
पाखरूही रानात...
नटून थटून जत्रा
भरली जणू दारात,
भासली मला तेव्हा
करवल्यांची वरात...
वर्षातून एकदा
सात जन्म मागता,
छळूण छळूण त्याला
रोज तुम्ही मारता....
बिचारा तोही कधी
माझ्याकडं आला नाही,
अन सात जन्माचं सत्य
कधी उकलले नाही...
संजय सावळे