बेगडी नाती....
जोडीत गेलो अधिक
वजा नाती होत गेली,
गुणाकार करण्याआधी
मधेच भागून गेली....
कोसळण्यापूर्वीच अधांतरी
वीजही चमकून गेली,
असे कुठले वैर ती
जमिनीशी जोडून गेली....
बेगडी पावसाची
ढगे वरती येत गेली,
अंकुरणारी नाती
मातीमधी कुजून गेली....
संजय सावळे