भुजंग आणि पाखरु...
थकुन देह विसावला तो
आम्र वृक्षांच्या गारव्याला,
तप्त धरती,उष्ण झळा
जाळती त्या पाखराला....
सरसर चढून घरट्याकडे
भुजंग वरती निघाला,
झोपली होती तयात पिल्ले
जणू काळ उभा ठाकला...
फणा काढून लाल भुजंग
न्हाहळे घरट्याला,
एकच गलका क्षणात उठला
उडवून भिरभिर पाखराला...
लढून थकला परत फिरला
हरला पाखरांच्या झुंडीला,
पुन्हा विसावती सारी पाखरे
आम्र वृक्षाच्या गारव्याला....
संजय सावळे