Get it on Google Play
Download on the App Store

धुमसत राहतो माणूस...

विस्तवासारखा धुमसत असतो   माणूस आतल्या आत...

वणव्यात उभी जळतात झाडे
धुमसतात तेही आतल्या आत...

जळण्यापूर्वी दोघातही
एकच साम्य दडतं आत...

दुःख,वेदना कलंकही 
जळुन उरतात बरेच त्यात...

स्वप्न,अस्तित्व,इच्छाही
सर्वच जळून जातात त्यात...

उरतो माघे आठवणींचा,
ठेवा असतो माघे त्यात...

हवेवरती उठतो धुरळा
जातात झाकून ढगही त्यात...

थकतो माणूस झाकतो माणूस
राहतो धुमसत आतल्या आत...

संजय सावळे