Get it on Google Play
Download on the App Store

गणित आयुष्याचं....

शून्यात मी मजला बघतो
क्षणभर स्वतः हरवून जातो,
न कळता नजरेत
डोह वेदनेचा भरून घेतो....

आयुष्य तरी असतं किती
सुखाचं जगणं सरून जातं,
विहिरीचं काठोकाठ भरलेलं 
पाणी क्षणात आटून जातं....

रोज सूर्य उगवतो
मावळतीला सोडून जातो,
दाटलेल्या अंधारात 
पुन्हा मी हरवून जातो....

स्वप्न बघावी तरी कुठली
आयुष्याला ना छेदली कधी,
जीवनाची दोर ही
कुणी शोधली का कधी.....

जन्मलो म्हणून काय जगायचं
मरतांना माघे काय सोडायचं,
सुख-दुःखाच गणित
आपलं आपणच मांडायचं....

संजय सावळे