Get it on Google Play
Download on the App Store

होल्ड अप प्रकरण 27

 

होल्ड अप प्रकरण २७
 कोर्टाच्या मागच्या बाजूला एकदम गलका झाला. पाणिनी ने मागे वळून पाहिले तर गौतम पिसे ला घेऊन कनक येताना दिसला.त्या मागोमाग लेडीज कॉन्स्टेबल ज्योतिर्मयी सुखात्मे ला घेऊन येतांना पाणिनी ला दिसली.
“ युअर ऑनर बचाव पक्षातर्फे मी आणखी दोनच साक्षीदार कोर्टासमोर आणू इच्छितो, सिया माथूर इथे येई पर्यंत. या दोघांनाही बचाव पक्षातर्फे समन्स दिले गेले आहे आणि ते अत्ता कोर्टात हजर आहेत. ”  पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे.कोण आहेत ते दोन साक्षीदार? ” न्यायाधीशांनी विचारलं.
“ त्यापैकी पहिला आहे गौतम पिसे.”
न्यायाधीशांनी बेलीफ ला सांगून गोतम ला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं रहायला सांगितलं.
“ गौतम, आपली प्रथम भेट कुठे झाली ते कोर्टाला सांग. ”  पाणिनी म्हणाला
“ आपण इथेच अत्ता पहिल्यांदा भेटतोय.”
“ अरे वा ! मुद्दामच नाकारतो आहेस? वास्तव समोर येण्याची भीती वाटत्ये म्हणून ? ”
“ मी कशाला घाबरेन? ” गौतम पिसे म्हणाला.
“ विलासपूर ला सिया माथूर च्या घरात आपली भेट झाल्याचं आठवतंय तुला? ”  पाणिनी म्हणाला
“ नाही.विलासपूर ला मी कधी गेलोच नाही. सिया माथूर कोण हे मला माहीत नाही.”
“ छान.”  पाणिनी म्हणाला आणि आपल्या ब्रीफकेस मधून त्याने दोन कागद बाहेर काढले.
“ युअर ऑनर, सिया माथूर चे विलासपूर मधे घर आहे. मी आणि माझी सहकारी सौम्या सोहोनी माझ्याकडे असलेली सिया माथूर च्या घराची किल्ली घेऊन विलासपूर ला गेलो होतो.या खटल्याच्या कामासाठी मला  त्या घरात असणारे सिया माथूर च्या हाताचे ठसे हवे होते म्हणून. त्यावेळी अचानक हा साक्षीदार तिथे दारात अवतीर्ण झाला. आम्हाला तिथे बघून तो घाबरला.आपले नाव गौतम पिसे असल्याचे आणि आपण भांडवा इथे रहात असल्याचे त्याने सांगितलं पण त्याचे लायसेन्स पाहिले तेव्हा त्यावर सातापाडी इथे रहात असल्याचा पत्ता दिला होता. तेव्हाच मला संशय आला. इथे का आलास असं त्याला  विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की मरुशिका व्हिला या नाईट क्लब मधल्या एका बारबाले बरोबर त्याचे प्रेम जमले.ती सिया माथूर ची बहिण होती आणि तिच्या काही वस्तू विलासपूरला सिया च्या घरातून आणून देण्यासाठी तिला त्याची मदत हवी होती म्हणून तो इथे आला होता.”  पाणिनी म्हणाला
“ हे सगळं धादांत खोटं आहे. मी कधीच विलासपूर ला गेलेलो नाही. मरुशिका व्हिला क्लब मला माहीत नाही.” गौतम म्हणाला.
पाणिनी ने आपल्या ब्रीफ केस मधून एक स्टील चे पॅड काढले.त्याला स्प्रिंग चा चिमटा जोडलेला होता.आणि त्याला एक कागद अडकवला होता.
“ तुला मारुशिका क्लब माहीत नाही तर त्या क्लब कडून तुला ही नोटीस कशी आली, तिथल्या बार मधे दारू चे बिल न भरल्याबद्दल?” पाणिनी ने पॅड त्याच्या हातात देत विचारलं.
पिसे ने ते पॅड हातात घेतले आणि त्याला लावलेला कागद वाचला.
“ काय चेष्टा चालवली आहे पटवर्धन तुम्ही? हा कोरा कागद आहे पॅड ला लावलेला. ” पिसे म्हणाला.
“ ओह ! काहीतरी गडबड झाली.” पाणिनी म्हणाला आणि त्याने पॅड आपल्या कडे परत घेतले.पण घेताना त्याने आपली बोटे पॅड च्या टोकाला  लावून ते पकडले. 
“ युअर ऑनर,त्या शहरात आईना हॉटेलात उतरल्याचे त्याने  मला सांगितलं होतं.हे पहा आईना हॉटेल चे रेकोर्ड.यात गौतम पिसे नावाने बुकिंग केल्याचा उल्लेख आहे.एवढंच नाही तर तिथून त्याने मारुशिका क्लब वर सायंकाळी फोन लावल्याचे रेकोर्ड ही उपलब्ध आहे.हा फोन त्याने हॉटेल च्या रिसेप्शानिस्ट ला लावायला सांगितला होता हवं तर तिची साक्ष काढता येईल. ”  पाणिनी म्हणाला
गौतम पिसेचे अवसानच गळले.त्याला घाम फुटला.
“ दॅट्स ऑल युअर ऑनर.” अचानक पाणिनी म्हणाला.
“ काणेकर, तुम्हाला काही विचारायचं आहे?” न्या. एरंडे यांनी विचारलं.
“ नो युअर ऑनर.” या होल्ड अप च्या खटल्याचा आणि गौतम पिसे च्या साक्षीचा खरं तर काहीही संबंध नाही. या साक्षीतून पटवर्धन यांनी काय साध्य केलं ते समजत नाही.” काणेकर म्हणाला.
“ समजेलच. लगेचच ” फक्त काणेकर ला ऐकू जाईल असं पाणिनी पुटपुटला.
“ माझा आणखी एक साक्षीदार, ज्योतीर्मयी सुखात्मे ला मी बोलाऊ इच्छितो.”  पाणिनी म्हणाला
“ हजर करा त्यांना पिंजऱ्यात.” न्यायाधीश म्हणाले.
“ आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या माणसाला तुम्ही या पूर्वी पाहिलंय?”  पाणिनी ने विचारलं
“ होय सर.”
“ काय नाव आहे त्याचे?”
“ नाव नाही माहिती पण त्यांना पहिल्याचंआठवतंय.” ज्योतीर्मयी सुखात्मे म्हणाली.
“ कधी नेमके? आणि कोणत्या स्थितीत? म्हणजे तुम्ही काय करत होतात तेव्हा?”  पाणिनी ने विचारलं
 १३ सप्टेंबर ला रात्री साधारण ११.३०-११.४५ ला मी माझ्या मैत्रिणी कडून घरी जात होते.घरा पासून दोन चौक अंतरावर असतांना एक करडया रंगाची गाडी माझ्या अगदी जवळून गेली.मी दचकून पाहिले तर गाडीची पुढची जाळी जरा फाटली होती, वाकली होती.ती गाडी थोडी पुढे जाऊन एका पार्किंग च्या जागी उभी राहिली. ”
“ पुढे काय झालं?”  पाणिनी ने विचारलं
“ पार्कींग ला गाडी लावल्यावर ती चालवणारा माणूस खाली उतरून डिकी उघडत होता, पण त्याला बहुदा माझी चाहूल लागली आणि त्याने पटकन डिकी बंद केली. गाडीला वळसा घालून तो पटकन ड्रायव्हर सिट वर बसला आणि इंजिन चालू ठेवलं.गाडीचे दिवे पण चालू केले.मी घाबरून तिथून पळ काढला आणि घरी आले.”
“ तुम्ही पोलिसांना कळवलं ”
“ त्या दिवशी नाही. म्हणजे त्या रात्री नाही. दुसऱ्या दिवशी मी पेपरात बातमी वाचली तेव्हा लगेचच पोलिसांना जाऊन भेटले.” ज्योतिर्मयी म्हणाली.
“ तुम्ही जेव्हा गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला पाहिलं तेव्हा पुरेसा उजेड होता रस्त्यात?”
“ बऱ्यापैकी होता.”
“ तुम्हाला आरोपीचा चेहेरा दिसला होता स्पष्ट?, घाई न करता आठवून उत्तर द्या.”
“ फार स्पष्ट नाही पण ओळखण्या एवढा होता.”
“ तुम्ही नंतर आरोपीला चौकीत ओळख परेड मधे ओळखलं?”
“ हो.”
“ किती खात्रीपूर्वक?”
“ खात्री दिली मी पोलिसाना.”
“ आरोपीला ओळखताना तुम्ही तुलना कशा वरून केली? म्हणजे प्रत्यक्ष पाहिलेली घटना की पोलिसांनी दाखवलेला फोटो?”
“ दोन्ही.” ज्योतिर्मयी म्हणाली.
“ ओळख पटवताना तुम्ही देहयष्टी ला जास्त महत्व दिलेत की चेहेऱ्याला?”
“ चेहेरा.”
“ पण तुम्ही मगाशी म्हणालात की चेहेरा फार स्पष्ट नव्हता दिसला. ”  पाणिनी म्हणाला
“ पण फोटोत तर चेहेरा स्पष्ट होता ना ! ”
तिच्या या उत्तराने काणेकर एकदम निराश झाला.
“ म्हणजे घटना घडली तेव्हा तुम्हाला त्याचा चेहेरा नीट दिसला नाही पण ओळख परेड मधे तुम्ही त्याला ओळखलत कारण तुम्ही फोटोतला चेहेरा आणि ओळख परेड मधल्या माणसाचा चेहेरा याची तुलना केलीत ”  पाणिनी म्हणाला
“ थोडंस तसचं.” ज्योतिर्मयी म्हणाली.
“ तुमच्या समोर त्या माणसाला पुन्हा उभा केलं तर त्याला ओळखू शकाल परत?”  पाणिनी ने विचारलं  “ आणि थांबा, उत्तर द्यायची घाई नका करू.”
“ मी कोर्टाला विनंती करतो की गौतम पिसे याला आरोपीच्या शेजारी उभे केलं जावं. ”  पाणिनी म्हणाला
“ ओह युअर ऑनर ! साक्षीदाराला मुद्दाम गोंधळून टाकायचा हा प्रयत्न आहे.” काणेकर म्हणाला.
“ तुम्ही हरकत घेताय?” –एरंडे
“ अर्थात.” –काणेकर
“ माझा निर्णय मी राखून ठेवतो.प्रथम पिसे यांनी आरोपी इनामदार याच्या शेजारी येऊन उभं रहावं.”—एरंडे.
पिसे ला आरोपी शेजारी उभे केले गेले.
“ज्योतिर्मयी मला सांग की तेरा सप्टेंबर च्या रात्री गाडीत बसलेला आणि गाडीतून उतरलेला आणि डिकी उघडणारा माणूस हा आरोपीच्या शेजारी उभा असलेला पिसे होता? ”  पाणिनी ने विचारलं
दोघांच्या शरीरयष्टीत असलेले साम्य बघून ज्योतिर्मयी एकदम गोंधळून गेली.
“ सांगा विचार करून सांगा. ती व्यक्ती आरोपी असू शकते तेवढीच पिसे सुध्दा असू शकते?”  पाणिनी ने विचारलं
“ माय गॉड ! ” ज्योतिर्मयी उद्गारली. “  अत्ता दोघांच्या अंगावर कपडे वेगळे वेगळे आहेत म्हणून माझा गोंधळ होतोय.”
“ प्रत्यक्ष घटना घडली  त्यावेळी तुम्हाला दिसलेल्या व्यक्तीच्या अंगावर जे कपडे होते तेच कपडे घालून जर दोघांना तुमच्या पुढे आणलं तर तुम्ही पाहिलेली व्यक्ती या दोघांपैकी कोण आहे असं तुम्ही सांगितलं असतं?”  पाणिनी ने विचारलं
“ पिसे.”
“ दॅट्स ऑल युअर ऑनर.”  पाणिनी म्हणाला.
(प्रकरण २७ समाप्त.)