Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण एक ते बारा 108

ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ हा नुसता आवाज

बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर देखील बुद्धाचे प्रमुख शिष्य चातुर्वर्ण्याला संमति देत नसत. हे चातुर्वर्ण्य कृत्रिम आहे, असे ते प्रतिपादीत त्याचे एक चांगले उदाहरण मज्झिमनिकायातील (सं. ८४) माधुरसुत्तात सपडते. त्याचा सारांश असा –

एके समयी आयुष्मान महाकच्चान मधुरेजवळ* गुंदावनात राहत होता. मधुरेच्या राजाने- अवंतिपुत्राने- महाकच्चानाची कीर्ती ऐकली. मोठ्या परिवारासह तो त्याजपाशी गेला व कुशलसमाचारादिक विचारून एका बाजूला बसला आणि महणाला, “भो कात्यायन, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्ण हीन आहेत. ब्राह्मणवर्णच शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत. ब्राह्मणानाच मुक्ति मिळेल. इतरांना मिळत नाही. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या सुखापासून झालेले ब्रह्मदेवाचे रस पुत्र आहेत. असे ब्राह्मण प्रतिपादितात यासंबंधी आपले म्हणणे काय आहे?

का.—हे महाराज, हा नुसता आवाज (घोष) आहे. समजा एखादा क्षत्रिय धनधान्याने किंवा राज्याने समृद्ध झाला तर त्याची सेवा चारी वर्णाचे मनुष्य करतील की नाही?

राजा—भो कात्यायन, चारी वर्णांची माणसे त्याची सेवा करतील.

का.—त्याचप्रमाणे इतर कोणत्याही वर्णाचा मनुष्य जर धनधान्ये व राज्याने समृद्ध झाला तर त्याची सेवा चारही वर्णाचे लोक करतील किंवा नाही?

राजा—चारी वर्णाचे लोक त्याची सेवा करतील.

का.—तर मग चारी वर्णाचे मनुष्य समान ठरत नाहीत काय?
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*हीच सध्याची मथुरा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजा—या दृष्टीने चारही वर्ण खात्रीने समान ठरतात. त्यात मला कोणताही भेद वाटत नाही.

का.—म्हणून मी म्हणतो की, ब्राह्मणच श्रेष्ठ वर्ण इत्यादि जे ब्राह्मणाचे म्हणणे आहे तो केवळ आवाज होय. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शुद्र या चारी वर्णातील माणसांनी प्राणघातादिक पापे आचरिली तर ते सारखेच दुर्गतीला जातील, असे महाराजाला वाटत नाही काय?

राजा—चारही वर्णापैकी कोणत्याही मनुष्याने पापकर्म केले तर तो दुर्गतीला जाईल.

का.—ठीक, महाराज, असे जर आहे तर चारही वर्ण समान ठरत नाहीत काय? तुम्हाला यासंबंधी काय वाटते?

राजा—या दृष्टीने चारही वर्ण खात्रीने समान ठरतात. त्यांच्यात मला भेद दिसत नाही.

का.—चारही वर्णांपैकी कोणी मनुष्य प्राणघातादिक पापापासून विरत झाला तर तो स्वर्गाला जाईल की नाही?

राजा—तो स्वर्गाला जाईल असे मी समजतो.

का.—आणि म्हणूनच मी म्हणतो की, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ. हा नुसता आवाज आहे. हे महाराज, समजा, तुमच्या राज्यात चारही वर्णापैकी कोणत्याही माणसाने घरफोडी, लुटालूट, परदारागमन इत्यादिक अपराध केले आणि त्याला राजपुरुषांनी आणून तुमच्यासमोर उभे केले, तर त्याला तुम्ही (त्याच्या जातीकडे न पाहता) योग्य तो दंड कराल की नाही?
राजा—तो जर वधार्ह असला तर त्याचा मी वध करीन, दंडनीय असला तर याला मी दंड करीन. आणि हद्दपार करण्याला योग्य असला तर त्याल हद्दपार करीन. का की, क्षत्रिय ब्राह्मणादिक जी त्याची पूर्वीची संज्ञा होती ती नष्ट झाली आणि तो गुन्हेगार आहे, असे ठरले.

का.—तर मग हे चारही वर्ण समान नाहीत काय?

राजा—ह्या दृष्टीने पाहू गेले असता चारही वर्ण समान ठरतात.

का.—समजा या चाही वर्णापैकी कोणताही मनुष्य जर परिव्राजक झाला आणि सदाचार पाळू लागला, तर तुम्ही त्याच्याशी कसे वागाल?

राजा—त्याला आम्ही वंदन करू, त्याचा योग्य मान ठेवू व त्याला अन्नवस्त्रादिक जरूरीचे पदार्थ देऊ. का की, त्याची क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शुद्र इत्यादिक संज्ञा नष्ट होऊन तो श्रमण या संज्ञेनेच ओळखला जातो.

का.—तर मग हे चारही वर्ण समसमान ठरत नाहीत काय?

राजा—या रीतीने हे चारही वर्ण खात्रीने समान ठरतात.

का.—म्हणून मी म्हणतो की ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे. हा नुसता आवाज होय.

हा संवाद झाल्यावर अवंतिपुत्र राजा महाकात्यायनाला म्हणाला, “भो कात्यायन, आपला उपदेश फारच सुंदर आहे, असे एखादे पालथे घातलेले भांडे ऊर्ध्वमुख करून ठेवावे, झाकलेली वस्तू उघडी करावी, वाट चुकलेल्याला वाट दाखवावी, किंवा डोळयांना पदार्थ दिसावा म्हणून अंधाराकडे मशाल पाजळावी, त्याप्रमाणे भगवान कात्यायनाने अनेक पर्यायांनी धर्मोपदेश केला. म्हणून मी भगवान कात्यायनाला धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातो. मी आजपासून आमरण शरण गेलेला उपासक आहे असे समजा.”

का.—महाराज, मला शरण जाऊ नका. ज्या भगवंताला मी शरण गेलो, त्याला तुम्ही देखील शरण जा.

भगवान बुद्ध

धर्मानंद कोसंबी
Chapters
**प्रस्तावना 1 **प्रस्तावना 2 **प्रस्तावना 3 **प्रस्तावना 4 **प्रस्तावना 5 **प्रस्तावना 6 **प्रस्तावना 7 प्रकरण एक ते बारा 1 प्रकरण एक ते बारा 2 प्रकरण एक ते बारा 3 प्रकरण एक ते बारा 4 प्रकरण एक ते बारा 5 प्रकरण एक ते बारा 6 प्रकरण एक ते बारा 7 प्रकरण एक ते बारा 8 प्रकरण एक ते बारा 9 प्रकरण एक ते बारा 10 प्रकरण एक ते बारा 11 प्रकरण एक ते बारा 12 प्रकरण एक ते बारा 13 प्रकरण एक ते बारा 14 प्रकरण एक ते बारा 15 प्रकरण एक ते बारा 16 प्रकरण एक ते बारा 17 प्रकरण एक ते बारा 18 प्रकरण एक ते बारा 19 प्रकरण एक ते बारा 20 प्रकरण एक ते बारा 21 प्रकरण एक ते बारा 22 प्रकरण एक ते बारा 23 प्रकरण एक ते बारा 24 प्रकरण एक ते बारा 25 प्रकरण एक ते बारा 26 प्रकरण एक ते बारा 27 प्रकरण एक ते बारा 28 प्रकरण एक ते बारा 29 प्रकरण एक ते बारा 30 प्रकरण एक ते बारा 31 प्रकरण एक ते बारा 32 प्रकरण एक ते बारा 33 प्रकरण एक ते बारा 34 प्रकरण एक ते बारा 35 प्रकरण एक ते बारा 36 प्रकरण एक ते बारा 37 प्रकरण एक ते बारा 38 प्रकरण एक ते बारा 39 प्रकरण एक ते बारा 40 प्रकरण एक ते बारा 41 प्रकरण एक ते बारा 42 प्रकरण एक ते बारा 43 प्रकरण एक ते बारा 44 प्रकरण एक ते बारा 45 प्रकरण एक ते बारा 46 प्रकरण एक ते बारा 47 प्रकरण एक ते बारा 48 प्रकरण एक ते बारा 49 प्रकरण एक ते बारा 50 प्रकरण एक ते बारा 51 प्रकरण एक ते बारा 52 प्रकरण एक ते बारा 53 प्रकरण एक ते बारा 54 प्रकरण एक ते बारा 55 प्रकरण एक ते बारा 56 प्रकरण एक ते बारा 57 प्रकरण एक ते बारा 58 प्रकरण एक ते बारा 59 प्रकरण एक ते बारा 60 प्रकरण एक ते बारा 61 प्रकरण एक ते बारा 62 प्रकरण एक ते बारा 63 प्रकरण एक ते बारा 64 प्रकरण एक ते बारा 65 प्रकरण एक ते बारा 66 प्रकरण एक ते बारा 67 प्रकरण एक ते बारा 68 प्रकरण एक ते बारा 69 प्रकरण एक ते बारा 70 प्रकरण एक ते बारा 71 प्रकरण एक ते बारा 72 प्रकरण एक ते बारा 73 प्रकरण एक ते बारा 74 प्रकरण एक ते बारा 75 प्रकरण एक ते बारा 76 प्रकरण एक ते बारा 77 प्रकरण एक ते बारा 78 प्रकरण एक ते बारा 79 प्रकरण एक ते बारा 80 प्रकरण एक ते बारा 81 प्रकरण एक ते बारा 82 प्रकरण एक ते बारा 83 प्रकरण एक ते बारा 84 प्रकरण एक ते बारा 85 प्रकरण एक ते बारा 86 प्रकरण एक ते बारा 87 प्रकरण एक ते बारा 88 प्रकरण एक ते बारा 89 प्रकरण एक ते बारा 90 प्रकरण एक ते बारा 91 प्रकरण एक ते बारा 92 प्रकरण एक ते बारा 93 प्रकरण एक ते बारा 94 प्रकरण एक ते बारा 95 प्रकरण एक ते बारा 96 प्रकरण एक ते बारा 97 प्रकरण एक ते बारा 98 प्रकरण एक ते बारा 99 प्रकरण एक ते बारा 100 प्रकरण एक ते बारा 101 प्रकरण एक ते बारा 102 प्रकरण एक ते बारा 103 प्रकरण एक ते बारा 104 प्रकरण एक ते बारा 105 प्रकरण एक ते बारा 106 प्रकरण एक ते बारा 107 प्रकरण एक ते बारा 108 प्रकरण एक ते बारा 109 प्रकरण एक ते बारा 110 प्रकरण एक ते बारा 111 प्रकरण एक ते बारा 112 प्रकरण एक ते बारा 113 प्रकरण एक ते बारा 114 प्रकरण एक ते बारा 115 प्रकरण एक ते बारा 116 प्रकरण एक ते बारा 117 प्रकरण एक ते बारा 118 प्रकरण एक ते बारा 119 प्रकरण एक ते बारा 120 प्रकरण एक ते बारा 121 प्रकरण एक ते बारा 122 प्रकरण एक ते बारा 123 प्रकरण एक ते बारा 124 प्रकरण एक ते बारा 125 प्रकरण एक ते बारा 126 प्रकरण एक ते बारा 127 प्रकरण एक ते बारा 128 प्रकरण एक ते बारा 129 प्रकरण एक ते बारा 130 प्रकरण एक ते बारा 131 *परिशिष्ट एक ते तीन 1 *परिशिष्ट एक ते तीन 2 *परिशिष्ट एक ते तीन 3 *परिशिष्ट एक ते तीन 4 *परिशिष्ट एक ते तीन 5 *परिशिष्ट एक ते तीन 6 *परिशिष्ट एक ते तीन 7 *परिशिष्ट एक ते तीन 8 *परिशिष्ट एक ते तीन 9 *परिशिष्ट एक ते तीन 10 *परिशिष्ट एक ते तीन 11 *परिशिष्ट एक ते तीन 12 *परिशिष्ट एक ते तीन 13 *परिशिष्ट एक ते तीन 14 *परिशिष्ट एक ते तीन 15 *परिशिष्ट एक ते तीन 16 *परिशिष्ट एक ते तीन 17 *परिशिष्ट एक ते तीन 18