*परिशिष्ट एक ते तीन 3
४
नंतर भिक्षुहो, बंधुमा राजाने विपस्सीकुमारासाठी तीन प्रश्नसाद बांधविले; एक पावसाळ्याकरिता, एक हिवाळ्याकरिता आणि एक उन्हाळ्याकरिता; आणि त्या प्रश्नसादात पंचेद्रियांच्या सुखाचे सर्व पदार्थ ठेवविले. ऊभक्षुहो, पावसाळ्याकरिता बांधलेल्या प्रश्नसादात विपस्सीकुमार पावसाळ्याचे चार महिने केवळ स्त्रियांनी वाजविलेल्या वाद्यांनी परिवारित होऊन राहत असे, प्रश्नसादाखाली उतरत नसे.
५
आणि भिक्षुहो, हजारो वर्षानंतर विपस्सीकुमार सारथ्याला बोलावून म्हणाला, ‘‘मित्रा सारथे, चांगली चांगली याने तयार ठेव. सृष्टिशोभा पाहण्यासाठी उद्यानात जाऊं.’’ सारथ्याने याने तयार केली आणि विपस्सीकुमार रथात बसून उद्यानाकडे जाणअयास निघाला. वाटेत गोपानसीप्रमाणे वाकलेल्या भग्नशरीर, काठी टेकीत कापत कापत चालणार्या, रोगी, गतवयस्क अशा एका म्हातार्या मनुष्याला पाहून तो सारथ्याला म्हणाला, ‘‘ह्या मनुष्याची अशी स्थिती का? त्याचे केस आणि शरीर इतरांप्रमाणे नाही.’’
सा॰- महाराज, हा म्हातारा मनुष्य आहे.
वि॰- मित्रा सारथे, म्हातारा म्हणजे काय?
सा॰- म्हातारा म्हणजे त्याला फार दिवस जगावयाचे नाही.
वि॰- मी देखील असा जराधर्मी आहे काय?
सा॰- महाराज, आम्ही सर्व जराधर्म आहोत.
वि॰- तर मग सारथे, आता उद्यानाकडे जाणे नको. परत वाडय़ात जाऊ या.
सा॰- ठीक महाराज.
असे म्हणून सारथ्याने अंत:पुराकडे रथ वळविला. तेथे विपस्सीकुमार दु:खी आणि उद्विग्न होऊन विचार करू लागला, की ह्या जन्माला धिक्कार असो, ज्याच्यामुळे जरा उत्पन्न होते!
बंधुमा राजा सारथ्याला बोलावून म्हणाला, ‘‘कायरे मित्रा सारथे, कुमार उद्यानात रमला काय? उद्यानात त्याला आनंद वाटला काय?’’
सा॰- नाही, महाराज.
राजा- का? त्याने उद्यानाकडे जाताना काय पाहिले?
सारथ्याने घडलेले वर्तमान निवेदित केले. तेव्हा बंधुमा राजाने विपस्सीकुमार परिव्राजक होऊ नये म्हणून त्याची पंचेंद्रियांची सुखे अधिकच वाढविली आणि विपस्सी त्या सुखात गढून राहिला.
आणि, भिक्षुहो, शेकडो हजारो वर्षानंतर विपस्सीकुमार पुन्हा उद्यानाकडे जाण्यास निघाला, वाटेत रोगी, पीडित, फार आजारी, आपल्या मलमूत्रात लोळणार्या, दुसर्याकडून उठविला जाणार्या आणि इतरांकडून वस्त्रे सावरली जाणार्या अशा एका माणसाला पाहून सारथ्याला म्हणाला, ‘‘याला काय झाले आहे? याचे डोळे काय, की स्वर काय, इतरांसारखा नाही!’’
सा॰- हा रोगी आहे.
वि॰- रोगी म्हणजे काय?
सा॰- रोगी म्हणजे या स्थितीत त्याला पूर्वीप्रमाणे वागता येणे कठीण आहे.
वि॰- मित्रा सारथे, याप्रमाणे मीदेखील व्याधिधर्मी आहे काय?
सा॰- महाराज, आम्ही सगळेच व्याधिधर्मी आहोत.
वि॰- तर मग, आता उद्यानाकडे जाणे नको; अंत:पुराकडे रथ फिरव.
त्याप्रमाणे सारथि रथ घेऊन अंत:पुराकडे आला. आणि तेथे विपस्सीकुमार दु:खी व उद्विग्न होऊन विचारात पडला की, ज्यामुळे व्दाधि प्रश्नप्त होते, त्या जन्माला धिक्कार असो!