*परिशिष्ट एक ते तीन 15
ज्या भिक्षूला आसक्ति नाही, ज्याने संसारस्रोत तोडले व जो कृत्याकृत्यापासून मुक्त झाला, त्याला परिदाह राहत नाही. १७
तुला मी मौनेय सांगतो- असे भगवान म्हणाला- क्षुरधारेवरील मध चाटणार्या तरसाप्रमाणे सावध व्हावे; जीभ ताळूला लावूनदेखील जेवणात संयम बाळगावा. १८
सावधचित्त व्हावे, पण फार चिंतनही करू नये; हीन विचारापासून मुक्त, अनाश्रित पण ब्रह्मतर्यपरायण व्हावे. १९
एकांतवासाची आणि श्रमणोपासनेची (ध्यानचिंतनाची) आवड धरावी. एकाकीपणाला मौन म्हणतात. जर एकाकी राहण्यात तुला आनंद वाटू लागेल. २०
जर ध्यानरत कामत्यागी धीरांचे वचन एटकून तू दशदिशा प्रकाशित करशील. तरी (पदाला पोचलेल्या) माझ्या श्रावकाने ऱ्ही (पायलज्जा) आणि श्रद्धा वाढवावी. २१
ते नद्यांच्या उपमेने जाणावे. ओढे धबधब्यावरून खिंडीतून मोठा आवाज करीत जातात; पण मोठय़ा नद्या सथपणे जातात. २२
जे उथळ ते खळखळते, पण जे गंभीर ते संथच असते. मूढ अध्या घडय़ाप्रमाणे खळखळतो; पण सुज्ञ गंभीर जलऱ्हदाप्रमाणे शांत असतो. २३
श्रमण (बुद्ध) जे पुष्कळ बोलतो ते योग्य आणि उपयुक्त असे जाणून बोलतो. जाणून तो धर्मोपदेश करतो व जाणून पुष्कळ बोलतो. २४
पण जो संयतात्मा जाणत असूनही पुष्कळ बोलत नाही, तो मुनि मौनाला योग्य आहे, त्या मुनीने मौन जाणले. २५
उपतिसपसिने
हे ‘सारिपुत्तसुत्त’ या नावाने सुत्तनिपातात सापडते. अट्ठकथेत याला थेरपञ्ह असेही म्हटले आहे. त्यावरून असे दिसते की याला सारिपुत्तपञ्ह किंवा उपतिस्सपञ्ह असेही म्हणत असावे. याचे भाषांतर येणेप्रमाणे-
आयुष्यमान् सारिपुत्त म्हणाला, --असा गोड बोलणारा, संतुष्ट व संघाचा पुढारी शास्ता, मी यापूर्वी पाहिला नाही किंवा ऐकला नाही. १
सर्व तमाचा नाश करून श्रमणधर्मात रत झालेला असा हा सदेवक जगाला एकच चक्षुष्मान् दिसत आहे. २
अनाश्रित व अदांभिक अशा त्या बुद्धपदाला पावलेल्या संघनायकापाशी मी पुष्कळ बद्ध माणसांच्या हितेच्छेने प्रश्न विचारण्यास आलो आहे. ३
संसाराला कंटाळून झाडाखाली स्मशानात किंवा पर्वतांच्या गुहांमध्ये एकान्नवास सेवन करणार्या भिक्षूला.४
तशा त्या बर्यावाईट स्थळी भये कोणती? त्या नि:शब्द प्रदेशात कोणत्या भयांना त्या भिक्षूने घाबरता कामा नये? ५
अमृत दिशेला जाण्यासाठी सुदूर प्रदेशात वास करणार्या भिक्षूने कोणती विघ्ने सहन केली पाहिजेत? ६
त्या दृढनिश्चयी भिक्षूची वाणी कशी असावी? त्याची राहणी कशी असावी? आणि त्याचे शील व व्रत कसे असावे? ७
सोनार जसा रुपे आगीत घालून त्यातील हिणकस काढतो, त्याप्रमाणे समाहित सावध आणि स्मृतिमान् भिक्षूने कोणता अभ्यासक्रम स्वीकारून आपले मालिन्य जाळून टाकावे? ८