Get it on Google Play
Download on the App Store

मोरू 1

मोरू म्हणून एक विद्यार्थी होता. आईबाबांपासून दूर एका शहरात तो विद्येसाठी राहत होता. त्याने एक खोली घेतली होती. तो फारसा श्रीमंत नव्हता, म्हणून तो हातानेच स्वयंपाक करी. त्याच्या खोलीत बिजलीची बत्ती नव्हती. साधा देशी कंदीलच होता. त्याच्या खोलीत तेलचूल (स्टोव्ह) नव्हती; साधी मातीचीच चूल होती. त्याच्या खोलीत फरशी नव्हती; साधी जमीनच होती.

मोरूची खोली लहानशीच होती. मोरू व्यवस्थित नव्हता. त्याला कामाचा अक्षयी कंटाळा. चूल कधी सारवायचा नाही. जमीन सारी उखळली होती. कंदिलाची काच काळी झाली होती. अंगातील कपडे मळले होते, निजावयाची सतरंजी, तिच्यात खंडीभर मळ साचला होता. तरी मोरू तसाच राहत होता. अगदीच ओंगळ व ऐदी.  एके दिवशी मोरू फिरायला गेला होता. एकटाच लांब फिरायला गेला. एका झाडाखाली एक मनुष्य बसला होता. मोरू त्याच्याकडे पाहू लागला. त्या माणसाच्या डोळ्यांतून पाणी येत होते. मोरूने त्याच्याजवळ जाऊन “तुम्ही का रडता?” असे विचारले. त्या मनुष्याला जास्तच हुंदका आला. मोरू- तुम्ही असे मुलासारखे ओक्साबोक्शी का रडता?

मनुष्य- आजूबाजूचे रडणे ऐकून मलाही रडू आले. मोरू- कोण रडत आहे? मला तर कोणाचे रडणे ऐकु येत नाही.

मनुष्य- तुझे कान तिखट नाहीत. तुम्ही सारे बहिरे झालेले आहात. तुमच्या कानात मळ भरला आहे.

मोरू- माझ्या कानात बिलकूल मळ नाही. मनुष्य- दुस-याची उपेक्षा करण्याचा मळ सर्वांच्या कानांत सारखाच भरून राहिला आहे. माझ्या आजूबाजूला मला सारखे रडणे ऐकु येत
आहे.

मोरू- मला दाखवा. मला ऐकवा.

मनुष्य- हे झाड रडत आहे. ती पलीकडे चरणारी गाय रडत आहे. मोरू- हे झाड रडत आहे. ती पलीकडे चरणारी गाय रडत आहे.

मोरू- हे झाड काय म्हणते?