जातककथासंग्रह भाग १ ला 12
५. सुखी संन्याशी.
(सुखविहारी जातक नं. १०)
एका कालीं बोधिसत्त्व औदिच्य ब्राह्मण कुलामध्यें जन्मला होता. तो वयांत आल्यावर गृहस्थाश्रमाला कंटाळून परिव्राजक झाला, व हिमालयपर्वतावर राहूं लागला. त्याच्याजवळ तेथें बरीच शिष्यशाखा जमली. एका वर्षाॠतूत तो फिरत फिरत काशीला आला, व तेथील राजाच्या उद्यानांत त्यानें राजाच्या आग्रहास्तव पावसाळ्याचें चार महिने घालविले. पावसाळा संपल्यावर तो आपल्या शिष्यांसह पुनः हिमालयावर जाण्यास सिद्ध झाला.
तेव्हां राजा त्याला म्हणाला, ''आतां तुम्ही वृद्ध झाला आहां. हिमालय पर्वताच्या टेकड्यांवरून चढण्या उतरण्यास तुम्हांस अतिशय क्लेश होतील. तेव्हां तुम्हीं येथेंच रहा व आपल्या शिष्यांना हिमालयावरील आश्रमांत पाठवा.''
बोधिसत्त्वाला राजाचें म्हणणें पसंत पडलें, आणि आपल्या एका प्रमुख शिष्याबरोबर सर्व परिव्राजकांना हिमालयावरील आश्रमांत पाठवून तो एकटाच त्या उद्यानांत राहूं लागला. काशीच्या राजानें त्याची व्यवस्था चांगली ठेविली.
बोधिसत्त्वाचा तो जेष्ठ शिष्य कांही काल सर्व परिव्राजकांसह हिमालयावरील आश्रमांत राहिल्यावर आपल्या सतीथ्यांना म्हणाला ''गुरूला पाहून पुष्कळ दिवस झाले. आतां मी एकटाच जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतों. तोंपर्यंत तुम्ही एकमतानें वागून आपल्या तपश्चर्येची अभिवृद्धि करा.''
तो अनुक्रमें काशीला येऊन आपल्या गुरूला भेटला, व संध्याकाळच्या वेळीं आश्रमाच्या ओसरीवर चटई टाकून विश्रांतीसाठीं पडून राहिला. इतक्यांत काशिराजा बोधिसत्त्वाच्या दर्शनाला तेथें आला. तो आश्रमांत जात असतां त्याला पाहून हा आगंतुक तापस उठला तर नाहींच पण ''अहो सुखं, आहे सुखम्'' असें उद्गारला. राजाला या यःकश्चित तापसानें आपला योग्य मान न ठेविल्याबद्दल फार वाईट वाटलें. पण बोधिसत्त्वाच्या मर्यादेस्तव आपला राग आवरून तो आश्रमांत शिरला आणि बोधिसत्त्वाला नमस्कार करून एक बाजूस बसला व म्हणाला, ''भदंत, आज आपल्या आश्रमांत एक आगंतुक तापस आला आहे असें वाटतें. पण तो खरा तापस नसावा अशी माझी समजूत झाली आहे. हा मनुष्य मीं आश्रमापाशीं पोहोंचलों तरी न उठतां खुशाल चटईवर लोळत होता, व मी जवळ आल्यावर 'अहो सुखं, अहो सुखम्' असें ओरडला. मला वाटतें तो फार आळशी असल्यामुळें आकंठ जेवून निजला असावा, व त्यांतच त्याला स्वर्गसुख वाटत असावें.''