जातककथासंग्रह भाग १ ला 42
३७. डामडौलानें यश मिळत नाहीं.
(भीमसेन जातक नं. ८०)
एकदां आमचा बोधिसत्त्व औदिच्य ब्राह्मणकुलांत जन्मला होता. लहानपणीं धनुर्विद्येचा त्याला फार नाद असे. वयांत आल्यावर तक्षशिलेला जाऊन एका मोठ्या प्रसिद्ध आचार्यांपाशीं त्यानें युद्धकलेचें आणि वेदाचें उत्तम ज्ञान संपादिलें. बोधिसत्त्व या जन्मीं जरा ठेंगू होता, व पुढल्या बाजूला वांकलेला होता. त्यामुळें त्याला छोटा धनुग्राहपंडित असें म्हणत असत. गुरुगृहीं शिल्पकलेचें अध्ययन करून झाल्यावर त्यानें असा विचार केला कीं, मी जर कोणत्याहि राजापाशीं माझ्या उपजीविकेसाठीं गेलों, तर माझें ठेंगू शरीर पाहून त्या राजाचा विश्वास मजवर बसणार नाहीं, तो म्हणेल कीं, अशा ठेंगू शरीरानें तूं काय पराक्रम करणार आहेस. तेव्हां दुसर्या कांहीं उपायानें आपली उपजीविका केली पाहिजे. एके दिवशीं बोधिसत्त्व चांगला एक धट्टाकट्टा मनुष्य मिळविण्याच्या उद्देशानें फिरत असतां त्याला भीमसेन नांवाचा एक कोष्टी आढळला. नांवाप्रमाणेंच त्याचें शरीर होतें. त्याला पाहून बोधिसत्त्व म्हणाला. ''तुझें नांव काय ?''
कोष्टी म्हणाला, ''माझें नांव भीमसेन.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''तुझें नांव व शरीर हीं दोन्हीं इतकीं चांगली असतां तूं हा कोष्ट्याचा धंदा कां पतकरलास ?''
कोष्टी म्हणाला, ''काय करावें ! याशिवाय दुसरी कोणतीच कला मला माहीत नाही.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''माझें जर ऐकशील तर उपजीविकेचा उत्तम मार्ग मी तुला दाखवून देईन. या सार्या जंबुद्वीपांत माझ्यासारखा धनुर्विद्याकुशल असा दुसरा माणूस नाहीं. परंतु माझ्या या र्हस्व देहामुळें राजाद्वारीं जाऊन राजाश्रय मागण्याची मला छाती होत नाहीं. पण तुला पुढें करून राजाजवळ गेलों असतां तुझ्या भक्कम शरीरावर राजाचा तेव्हांच विश्वास बसेल, मला तूं आपला मदतनीस म्हणून ठेवून घे, व आपण स्वतः मोठा धनुर्विद्या निष्णात आहे असें राजाला सांग. प्रसंग पडलाच तर मी आपल्या कौशल्यानें राजाचें समाधान करीन.''
ही गोष्ट भीमसेनाला पसंत पडली. ते दोघे वाराणसीच्या राजाला भेटले. राजानें भीमसेनाच्या शरीरावर प्रसन्न होऊन दरमहा दोन हजार कार्षापण वेतन देऊन आपल्या पदरी ठेऊन घेतलें.
बोधिसत्त्व भीमसेनाचा मदतनीस म्हणून राहिला. एके दिवशीं एका दांडग्या वाघानें जंगलांतील रस्ता ओसाड पाडला अशी बातमी आली. तेव्हां राजानें वाघाला मारण्याच्या कामीं भीमसेनाची योजना केली. बिचारा भीमसेन वाघाचें नांव ऐकल्याबरोबर गांगरून गेला ! व बोधिसत्त्वाला म्हणाला, ''पंडिता, आतां या संकटांतून पार पाडण्यासाठीं तुलाच मजबरोबर गेलें पाहिजे.''