ज्यू कॅलेंडर
ज्यू लोकांचे कॅलेंडरहि काहीसे चांद्रगणनेवर आधारलेले आहे. ज्यूंचा दिवस मात्र सूर्यास्तापासून सुरू होतो. हिंदूंचा आठवडा सात दिवसांचा व प्रत्येक दिवसाला सोम-मंगळ अशी नावे आहेत. ज्यूंचाहि सात दिवसांचा सप्ताह असतो. पण पहिल्या सहा दिवसाना नावेच नाहीत. पहिला - दुसरा असे म्हणावयाचे. सातव्याचे नाव शब्बाथ. तो हिंदूंचा (बहुधा) रविवार.