हिंदूंचे वर्ष
हिंदूंचे वर्ष १२ चांद्र महिन्यांचे व सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी २८-२९ महिन्यांनंतर एक अधिक महिना येतो. त्याबद्दलचा नियम सूर्याच्या राशिसंक्रमणाशी जोडलेला व सुस्पष्ट आहे. ज्यू लोकहि अधिक महिना घेतात. मात्र त्याचे नियम वेगळे आहेत. दर १९ वर्षांच्या चक्रामध्ये ३,६,८,११,१४,१७ व १९ ही वर्षे अधिक महिन्याची. हा अधिक महिना दर वेळेला ११व्या महिन्यानंतरच येतॊ व तो ३० दिवसांचा असतो. बाराव्या महिन्याचे नाव अडार असे आहे. अधिक महिन्याचे नाव अडार-१ असे होते व बारावा महिना त्या वर्षी अडार-२ असे नाव घेतो. हिंदूंमध्येहि अधिक चैत्र व निज चैत्र असे म्हणतात.