Get it on Google Play
Download on the App Store

मुसलमानांची कालगणना

 मुसलमानांची कालगणना चांद्रवर्षानुरूप होते. वर्षाचे बारा चांद्रमास असतात व त्याना नावे आहेत. महिने शुक्ल प्रतिपदेला सुरू होतात. हिंदु-ज्यू कालगणनेपेक्षा मुख्य व महत्वाचा फरक म्हणजे सौरवर्ष व चांद्रवर्ष यांतील सुमारे ११ दिवसांचा फरक जुळवून घेण्यासाठी अधिक महिना वा इतर काही व्यवस्था नाही. बारा चांद्र महिने संपले की नवीन वर्ष सुरू! त्यामुळे वर्षारंभ व इतर सण वा उपासना दिवस दर वर्षी मागेमागे येतात. दर ३३ वर्षानी गाडी पुन्हा मूळपदावर येते. इस्लामच्या उदयापूर्वी अरबस्तानात ज्यूंची कालगणनाच होती. तेव्हाचे प्रचारातील आदिवासी वा ज्यू सणवार ऋतुचक्राशी निगडित होते. असे वाचनात आले की या सणांचा इस्लाम धर्मीयांवर पगडा राहू नये यासाठी महंमद पैगंबराने अधिकमासाची पद्धत जाणीवपूर्वकच बंद केली. त्यामुळे जुने सणवार लोक विसरले. हिजरी सन व इसवी सन याचे एकास एक असे नाते राहत नसल्यामुळे इतिहास संशोधकाना त्याची कोष्टके बनवून काळजीपूर्वक वापरावी लागतात!