Get it on Google Play
Download on the App Store

पारशी कालगणना

पारशी धर्म व संस्कृति ही फार प्राचीन. त्यांची कालगणना आणखीनच गोंधळाची आहे. शिवाय इराणातील उरलेले पारशी व भारतातील पारशी यांच्यातहि फरक आहे. फसली, कदमी व शहेनशाही अशी तीन कॅलेंडरे त्यांच्यात प्रचारात आहेत. फसली पद्धतीप्रमाणे ३०दिवसांच्या १२ महिन्यांचे वर्ष होते. शेवटच्या महिन्यानंतर ५ किंवा लीप इयरच्या वर्षी  जादा बिननावाचे दिवस जोडले जातात. वर्षाची सुरवात वसंतसंपाताच्या दिवशी २३ मार्चला होते. संपात दिवस थोडाथॊडा मागे येत असल्याने तो एक दिवस मागे येईल तेव्हा बहुधा ते एक दिवस गाळतील! वर्षारंभ वसंतसंपाताला घेणे हे शास्त्रशुद्ध आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरमध्येहि १ जानेवारीला वर्षारंभ करण्यापेक्षा वसंतसंपातापासून करणे योग्य होईल. पण हा बदल आता कठीण आहे! ही पद्धत भारतातील एका विद्वान पारशाने सुचवली व इराणात ती अमलात आली पण भारतातील पारशांनी ती स्वीकारलेली नाही! त्यांच्या इतर दोन पद्धती मला नीटशा कळल्याच नाहीत.