चित्तीं धरोनियां राहीन मी...
चित्तीं धरोनियां राहीन मी पाय । तो मज उपाय संपत्तीचा (?) ॥१॥
कंठीं धरीन मी नामामृतमाळ । होईल शीतळ देह माझा ॥२॥
पाहतां श्रीमुख साजिरी हे प्रभा । उगविली शोभा लावण्याची ॥३॥
केला अंगसंग आवडते परी । बैसेन तोंवरी कडियेसी ॥४॥
तुका म्हणे तुम्ही केलें तैसें नव्हे । अन्याय सहावे करीन ते ॥५॥