सर्व धर्म मन विठोबाचें ना...
सर्व धर्म मन विठोबाचें नाम । आणिक तें वर्म नेणें कांहीं ॥१॥
ऐसा माझा देव आहे कोठें सांगा । भक्ता अंगसंगा अहर्निशीं ॥२॥
काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥३॥
तुका म्हणे माझा कोण अधिकार । मज तो विचार कळों यावा ॥४॥