आतां मज नाहीं येणेंवीण का...
आतां मज नाहीं येणेंवीण काम । म्हणउनी नाम आठवितों ॥१॥
कर्म तैसें फळ पुढें उभें ठाके । बाधकेचे धोके घडतील ॥२॥
होणार जें ज्याचें होत असे तैसें । प्रारब्धासरिसें संचित तें ॥३॥
तुका म्हणे विठो निर्वाणीचा साह्य । म्हणोनियां पाय आठवितों ॥४॥