आम्ही खावें प्यावें । जमा...
आम्ही खावें प्यावें । जमाखर्च तुझ्या नांवें ॥१॥
ऐसी लाधलोंसें धणी । इंद्रपद कोण गणी ॥२॥
जें जें इच्छूं धडगोड । तें तें पुसविसी कोड ॥३॥
लक्ष्मीवरी आमुची सत्ता । तुझ्या कृपेनें अच्युता ॥४॥
तुका ह्मणे काय । तूंचि माझा बापमाय ॥५॥