Get it on Google Play
Download on the App Store

जगा आणि जगू द्या!

लेखक - मयूर बागुल, अमळनेर (मो. ९०९६२१०६६९)

आम्ही सारे भारतीय म्हणजे नेमके खरच भारतीय म्हणून गणराज्य संघ व्यवस्थेत १९५० पासून संविधानिक अधिकार मिळाला समता, स्वतंत्र्य, बंधुता, न्यायआज मागे वळून बघितले तर खर हे सगळे बदलेले दिसते का? मिडिया प्रत्येक वेळी विविध राजकीय पुढाऱ्यांचे लेखा जोखा मांडतेआणिविरोध करणारे विरोध करतील आणि सत्ताधारी आपल्या कामाचे मार्केटींग करतील यासर्वान मध्ये सर्व सामान्य जनता कुठल्या दुखात जगते आहे यांचा लेखा जोखातीव्र स्वरुपात कधी मांडणार हाप्रश्नप्रत्येक वेळी पडत आसतो यासाठी तर संसद कायदे मंडळ असते. पण कालांतराने तिचा देखील काही वेळा अपमान होतांना दिसतो सर्व सामान्य जनतेने लोकहिता साठी या पवित्र सभागृहात पाठवले प्रतिनिधीनिवडून पाठवले असते पण जर तिथे बघितले तर प्रतिनिधीची उपस्थिती किती असते. बेताल वक्तव्य उपदेश देणे असले काम करून त्या संसदेचे कुठले पवित्र राखतात. आज तळागळातील माणूस जीवन सुधारण्यासाठी जगतो पण समाजातील निकृष्ठ व घाणेरड्या प्रवृत्तीचे लोक स्वताच्यास्वार्थसाठी वाटेल ते करतात पण याला तरी आपण काय करणार प्रत्येकालकळते पण जे घडते त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे सगळी कडे जसे वाटेल तसे चालू द्या बघू हा “आपलामाणूस”ही प्रत्येकाची नीतीमत्त झाली आहे. कामातीलप्रामाणिकपणा लोप पावताना दिसतो उदासीनता वाढत आहे.

खरेकी यादेशातील चौथा स्तंभ मिडियायाने तरी समाजा पुढे आदर्श ठेवावा पण आज यावरचा देखील जनतेचाहळूहळू विश्वास ठेवणे कमी होताना दिसते काय दाखवावे किंवा काय दाखवू नये याचे काही तारतम्य राहिले नाही पण या बाबतीत सरकारी मिडिया आपला आदर्श नेहमी बाळगून असतात. सरकार आणि समाज म्हणजे काय समाजातूनच तर सरकार तयार होते. जे प्रतिनिधी निवडले जातात ते समाजातूनच तर निवडले जातात तरमग सरकार दुसरे तिसरे काही नसून समाजातील सर्व नागरिकच सरकार आहे फरक एवढा आहे कि लोकशाही बाळगुन व नैतिकता, मूल्य, तत्वबाजूला ठेऊन निवडून येतात सर्व तसेच नसतात पण प्रमाण बघितले तर नक्कीच जास्त दिसेल मग आपण बघतो तेच तेच चेहरे आमदार, खासदार म्हणून ५ वर्ष मी तर ५ वर्ष तू हे च मग कुठली लोकशाही म्हणावी आपण एवढेच काय तर सरकारी संस्था देखील यांच्या असतात प्रत्येक पक्ष खिच्यात घेऊन फिरतात इकडे नाही मिळाले तिकडे मिळेल तिकीट आपण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी बघितले असेलच वेगळे काही नाही मरतो तो फक्त दिन दुबळा सर्व सामान्य माणूस यासाठीचा कधी मिडिया लेखा जोखा सर्व सामान्य जनतेचा माडते का? जरी मांडला तरी पुढे त्याचा पाठपुरावा कोण करणार प्रश्न येथे येऊन थांबतो. 

जर आज प्रत्येक नागरिक जबाबदार जागृत राहून जगू लागला तर कशाला कोणाची हिम्मत होईल जिथे चुकत आहे तिथे ती चूक दाखवलीच पहिजेआन्याय सहन न करून घेता ताकदीने कधी सर्व लढणार आहे का एकटा लढलो तर दाभोलकर, पानसरे सारखा गळा घोटला जातो पण हे लक्षात नाही येत या समाजकंटक लोकांना विचार कधीघोटला नाही जात तर विचार आजून खंबीर प्रमाणात समाजात पेरली जातात. आजभारत युवकांचा देश म्हणून आपले प्रांतप्रधान मोदी जी मोठ्या अभिमानाने सांगतात अश्या वेळी विचार येतो मग या सरकार मध्ये किती टक्के प्रतिनिधी आजयुवक आहे. ज्यांच्या कडे कौशल्य नेतृत्वाचे प्रमाण कमी ते राज्य करतात हा प्रश्न पडतो तरमग ऐकी कडे जर बघितले तर वारस परंपरा पिढीने पुढे आलेली दिसून येते जणू यांची मक्तेदारी चालू आहे. दुसऱ्याने कधी मोठे होऊच नये सर्वच युवक नाही जाऊ शकत पण हि संधी उपलब्ध असून समाजतीलधनाढ्य लोक आपल्या आर्थिक तिजोरीतून क्षणिक सुख आश्वासने, पार्टी देऊन आपले स्थान निर्माण करतात मग अश्या वेळी मिडिया लेखा जोखा का मांडत नाही. आज समाजातील प्रत्येक सर्व सामान्य जनता पैसे घेऊन मतदान करते हे सत्य कोणी लपवून ठेऊ शकत नाही किती जरी आपण यावर जन जागृती केली तरी पण या सर्व प्रकारासजबाबदार कोणाला ठरवता येईल सामन्या जनतेचा रोष दिसतो ती कंटाळलेली असते कारण तिला वाटते कि आज पैसे घेऊननिदान २ ते ४ दिवस तरी उदर निर्वाह करू शकेल कारण गेली ६० वर्षा पासून प्रामाणिक पणाचा फायदा घेतला गेलाएवढ्यावेळी निवडून दिले त्यांना पण जनतेचा विकास सोडून स्वताचा विकास दिसतो. उदा. शाळा, कॉलेज, दवाखाने, मंदिर, कारखाने, बँकइ. मगसांगा विकासाची गंगा कोण कडे गेली सर्व सामान्य जनते कडे की प्रतिनिधी कडे आपण म्हणतो कायदे न्याय आहे पण प्रत्येक कायदा मधून पळवाट कडू लागले कायदे सर्व सामान्य जनतेला न्याय देणारे नाही असे जर असते तर मग समाजातीलदलित अत्याचार पिडीत कुटुंबाला न्याय का मिळत नाही. समाजातील नागरीकाला काय पाहिजे आहे याच्या कधी विचार केला जातो कि नाही कुठली हि योजना आली कि पहिले त्यात भागीदारी ठरलेली असते खालून तर वर पर्यत हिशोब ठरलेले असतात मग काय उदा. १००० ऐवजी १०० दिसतात हे प्रकार घडलेले आहे.

यावर मी एकच म्हणेलप्रत्येक स्तरातील नागरिकाने जे मिळते आहे त्यात सुखी व समाधन मानावे प्रामाणिक पणा ठेऊन निष्ठेनेकाम करा नुसते महानथोर पुरुषांचाआदर्शफोटो लावून किंवाजय जयकार करून प्रेमबाळगू नका तर त्याच्या मुल्यातून व तत्वातून ज्ञान घेण्यास शिकावे आज जर नाही सुधारलो तर उद्याचा समाज कधीच माफ करणार नाही.

शेवटी जगा आणि जगू द्या....!


यश खूप दूर आहे असे जेंव्हा आपल्याला वाटते...तेव्हा ते खूप जवळही असू शकते.

जेंव्हा तू प्रतिकुल परिस्थतीशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस... प्रयत्नांनीच तुला थकवा येईल

तेव्हा थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस अजिबातच

माघार घेऊ नकोस...

येणा-या सर्व आव्हानांसाठी सज्ज रहा, त्यांना खंबीर मनाने सामोरे जा

ऐरण झालास तर घाव सोस...

हातोडा झालास तर घाव घाल !!

- माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम

समाजातील सर्व विकारांचे मर्म वैदिक कर्मकांडांत आहे ... धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास,

 

व्रतवैकल्ये

आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ

आहेत...

ते सर्व परिपाठ भिक्षुकांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित

केले आहेत...

या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो

विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर

अन्याय होतो सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते .

-प्रबोधनकार ठाकरे.

 

बापहो आपल्या मुलाले शिक्षण द्या, पैसे नाही म्हणाल

तर जेवणाचे ताट द्या,

हातावर भाकरी खा, बायकोले

लुगडं कमी भावाचे घ्या, पण मुलाले शाळेत घातल्या विना राहु नका.

- राष्ट्रसंत संत गाडगेबाबा.

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१५

अभिषेक ठमके
Chapters
संपादकीय प्रस्तावना अमेरिकेतील एक डेटिंग सेंटर (डेटींग - मनाची उकल संकल्पना) कुटुंबाचा आधारवड जगा आणि जगू द्या! ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...! दोन बालकांची पत्रे ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय – एक मनःपटलावरील युद्ध अश्रुधार शिक्षणाचा बोजा (नाना पाटेकर) जे तुला शिकता आले नाही… अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम... श्रद्धा सर्वांनी लक्षात ठेवावे असे... सामन्याने पाहिलेले असामान्य स्वप्न नाते समृद्ध होण्यासाठी... जमिनीवर बसून जेवणाचे फायदे स्वर्ग आणि नरक आहाराविषयी ‘ओम’ नाम चांगली विचारधारा Marathi Status दिवाळी नमू प्रारंभी गणेश दंगल साम्राज्य...! गूढ मनाच्या खेळी खेळ...! शिवबाची कृपा छत्रपती शिवाजी धरणीमाता क्षण मी व राजकारणी भरत उपासनींच्या चारोळ्या तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल आळस