साम्राज्य...!
लेखक - भरत उपासनी
ह्या विराट अंधाराच्या पोटात...
नेमकं काय दडलंय...
काहीही कळत नाही..
अडखळत,ठेचकाळत,पडत,धडपडत...
सोनेरी स्वप्नांच्या अपेक्षेत..
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर..
माझ्या हातातला छोटासा दीपक..
सांभाळत मी चाललो आहे..
अंतर्मनाच्या गाभाऱ्यातून..
एक आवाज येतो आहे..
पान्थस्थः चालत रहा..!
थकला तरी चालत रहा..!
पडला तरी उभा रहा..!
आता थोडयाच अंतरावर..
मी तुला भेटणार पहा..!
मग प्रकाशाच्या साम्राज्यात..
तू पाय रोवून उभा रहा..!